
शिंदे गटाकडून पंतप्रधानांचे समर्थन ठाकरेंवर टीका…
कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत.
याचबरोबर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुनावनी सुरू झाली असून, या प्रकरणातील नवनवे होत आहेत. तसेच छत्रपती संभाजीराजे यांनी कोणतेही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे नसल्याने रायगड किल्ल्यावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला राज्यातील काहींनी विरोध केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेबाची कबर आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियानच्या मृत्यूचा मुद्दाही गाजला होता. त्याबाबत अधिवेशनानंतरही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.