
संजयकाकांची घरवापसीचे संकेत…
भाजपचे माजी खासदार पण सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेमध्ये सांगलीची धूरा सांभाळणारे माजी खासदार संजय पाटील यांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चांना आता वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. पण भाजपच्या वरिष्ठ नेते किंवा पक्षश्रेष्ठींकडून याबाबत कोणतीच माहिती मिळत नव्हती. पण आता भाजपचे चिंचणी म्हटले जाणारे सांगलीचे पालकमंत्री तथा प्रमुख नेते चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्याने आता या चर्चांना बळ येत आहे. संजयकाकांची घरपावसीचे संकेत त्यांनी दिले आहेत.
माजी खासदार संजय पाटील यांचा लोकसभेवेळी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. तर राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरले होते. पण येथे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी पराभव केला. यामुळे ते पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सक्रीय नव्हते. उलट त्यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावत थेट स्टेजवर बस्तान मांडल्याने त्यांना भाजपत परतीचे वेध लागल्याची जोरदार चर्चा सुरू झाल्या होती.
पण आता या चर्चांना मृत रूप येण्यारी घटना येथे घडली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून त्यांच्या भाजप प्रवेशाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. चंद्रकांत पाटलांनी चिंचणी येथे पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळेच आता त्यांच्या घरवापसीचे स्पष्ट संकेत मिळत आहे. पण त्यांच्या प्रवेशाची अद्याप तारीख समोर आलेली नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच सांगली दौऱ्यावर येणार असून त्या दौऱ्यात किंवा मुंबईत त्यांचा प्रवेश होईल असेही चर्चा रंगली आहे.
चंद्रकांत पाटील पाटील यांनी पहाटे पहाटे माजी खासदार पाटील यांच्या चिंचणीतील घरी भेट दिली. यावेळी युवा नेते प्रभाकर पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तर भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. ही काही धावती भेट नाहीतर पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे समोर आले आहे. या या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढली होती. ज्यात त्यांचा रोहित पाटील यांनी पराभव केला होता. या पराभवामुळे ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. पण मध्यंतरी त्यांनी भाजप कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावत भाजप प्रवेशाची मनशा स्पष्ट केली होती. त्यांचा भाजपकडे ओढा कायम राहिल्याचे दिसून आले होते. तर आत्ता चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे ते पुन्हा एकदा ‘ॲक्टिव्ह मोड’वर येतील असे संकेत मिळत आहेत.
मनोमिलन होणार
2014 ला संजय पाटील भाजपमध्ये आले आणि खासदार झाले. ते 2019 लाही खासदार झाले. पण यादरम्यान राज्यातील सत्तेत असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे जुळत नव्हते. आतापर्यंत त्यांचे कधीच जमले नाही. पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नाराजांना एकत्र करण्याची रणनीती भाजप आखत आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्रकांत पाटील आणि संजयकाका यांचे सूर जळताना दिसत आहेत. तर संजयकाका यांचा पक्ष प्रवेश झाल्यास या दोन नेत्यांमध्ये मनोमिलन होईल असेही बोलले जातयं.