
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूगाव :
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली होती ,त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांनी तेरा दिवस अनुष्ठान मांडले.आणि प्रश्न केला की माझी गाथा बुडणार असेल तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे. तेंव्हा भगवंतांने ते छातीशी कवटाळून धरले होते,आणि इंद्रायणी मातेने ते तेरा दिवस जपले होते.चौदाव्या दिवशी ती गाथा दगडासहीत वर आल्या ,तेंव्हा तुकाराम जळी दगडा सहित वह्या।तारियेल्या जैश्या लाह्या ।
संत तुकाराम महाराजांची गाथा दगडाला बांधून इंद्रायणीत बुडवली होती ,पण ती बुडवली नव्हती तर गाथेने दगडाला सुद्धा तारून वर आणले.आपण जो गाथा हस्तलिखित स्वरूपात लिहीत राहिलात तर देव कोठे आहे हे कळेल ,,तुका म्हणे अक्षर हाचि देव अक्षर हाच खऱ्या अर्थाने देव आहे,तुकारांमांचे अक्षर हाच देव आहे,तुकारामांचे शब्द हे अमौलिक रत्न आहेत.ते आपल्या जीवना मध्ये प्रभाव टाकतात.असे प्रतिपादन देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी श्रीक्षेत्र देहूगाव येथे केले.
गाथा परिवाराच्या वतीने सोमवार ( ता.३१ ) गाथा पुनरुत्थाण दिवस ,अर्थात गाथा तरली तो दिवस ,या दिवसा निमित्त देहूगाव येथील गाथा मंदिरा जवळ असलेल्या इंद्रायणी घाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,त्या प्रसंगी हभप पुरुषोत्तम महाराज बोलत होते.
सकाळी ८ वाजता गाथा दिंडी कडण्यात आली.
गाथा परिवाराच्या वतीने सकाळी ८ : ३० वाजता इंद्रायणी नदीत उभे राहून गाथा वाचन करण्यात आले.हभप भारत महाराज यांचे व्याख्यान सकाळी ९ वाजता ,अभंग गायन सकाळी ९ : ३० वाजता. आणि दुपारी १२ वाजता गाथा मंदिर या ठिकाणी महाप्रसाद देण्यात आला.
——————————————–
आपण तुकाराम महाराजांची गाथा हस्तलिखित स्वरूपात लिहिताय ,हा उपक्रम खूप चांगला आहे.खर संत तुकोबारायांनी आपल्याला हा अधिकारच दिलाय. तुकोबाराया झाले नसते तर सर्व सामान्य बहुजन समाजाला परमार्थाचा अधिकारच दिला आहे.
हभप माणिक महाराज मोर
विश्वस्त संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थान देहू
———————————————
तर हत्ती वरून घोरावडे ,भंडारा ,देहूगाव अशी परिक्रमा करणार
शेखर महाराज जांभूळकर
यापूर्वी ज्ञामोबा रायांच्या ज्ञानेश्वरीची सेवा केली.तद्नंतर संत एकनाथ महाराज भागवताची हस्तलिखित लिहिण्याची सेवा केली.त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती.त्यानंतर ८६ वर्षानंतर काशीच्या लोकांनी हा कार्यक्रम पहिला.त्यानंतर आता संत तुकाराम महाराज गाथेचा एक लाख हस्तलिखित करण्याचा गाथा परिवाराचा मानस आहे.तो ही संत तुकोबारायांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल.आज गाथा पुनरुत्थान दिन आहे.त्या अनुषंगाने ज्या डोहात गाथा तरली, त्या ठिकाणी सगळ्या भाविक भक्तांना घेऊन आज आम्ही पुनरुत्थान दिन साजरा करत आहोत.या निमित्त आम्ही एक संकल्प केला असून एक वर्षाच्या आत संत तुकाराम महाराजांच्या गाथा चे हस्तलिखित करून भंडारा डोंगर ,घोरावडे , आणि देहूगाव अशी हत्तीवरून परिक्रमा करणार आहोत.
या कार्यक्रमा प्रसंगी देहूदेवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे ,विश्वस्त माणिक महाराज मोरे ,भानुदास महाराज मोरे ,संत तुकाराम महाराजांचे वंशज अनिकेत महाराज मोरे , पिंपरी चिंचवड वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विजय जगताप , तसेच शेखर महाराज जांभुळकर , विजय गायकवाड ,तानाजी काळभोर , अनिल पारखी , प्रफुल्ल शेळके , सुधीर ढगे , कैलास कातळे , देहूचे माजी सरपंच मधुकर कंद , तसेच उद्योजक शंकर मांढरे ,तसेच गाथा परिवाराचे सर्व सदस्य भाविक भक्त उपस्थित होते.