
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : तालुक्याच्या सहकार चळवळीचा मुख्य कणा असलेल्या शिरूर तालुका खरेदी-विक्री संघावर उरळगावचे नामदेव गिरमकर संचालक म्हणून सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले पुणे जिल्हा जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष नामदेव गिरमकर यांनी सत्तेसोबत जात राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत सर्वांनाच धक्का दिला. ते मा. आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक मानले जात होते.
गुढीपाडवा म्हणजे संकल्प करण्याचा दिवस ! अशा विशेष दिवशी आपण आपापल्या परीने काहीतरी ठरवतो, निश्चय करतो. यंदाही उरळगाव ग्रामस्थ एकत्र येत वार्षिक जमखर्चाचा लेखाजोखा बैठकीत पार पडला. याच बैठकीत नवनिर्वाचित संचालक नामदेव गिरमकर यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडून त्यांचा फेटा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांमध्ये उरळगावचे ज्येष्ठ नागरिक प्रभाकर जांभळकर, तुकाराम जयवंतराव गिरमकर, जयवंतराव गिरमकर, दशरथ आफळे गुरुजी, शंकरराव गोटे, दशरथ सात्रस, पोपट दादा गिरमकर, रघुनाथ भाऊ गिरमकर, अशोकराव कोळपे, तुकाराम महाराज गिरमकर, राजेंद्र भाऊसाहेब सात्रस ( ग्राम विकास अधिकारी तळेगाव ढमढेरे ) मा. उपसरपंच राजेंद्र बबनराव गिरमकर,पोलीस पाटील सागर रघुनाथ गिरमकर तसेच उरळगावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन व्हॉइस चेअरमन,सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.