
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर)
केंद्र सरकारने सोयाबीन व इतर पिकांची वायदे बाजारातील ‘एनसीडीईएक्स’वरून होणारी खरेदी विक्री ला नोव्हेंबर 2021 मध्ये बंदी आणली होती .
वायदे बाजारातील दर हे शेतकऱ्यांना भावाचे दिशादर्शक म्हणून काम करतात , कोणत्या मालाची कोणत्या वेळी चांगल्या दरात विक्री करावी यासाठी वायदे बाजारातील दर शेतकऱ्यांना मदत करतात. परंतु वायदे बाजारातील सोयाबीन व इतर पिकांच्या बंदीमुळे शेतकऱ्यांना भाव वाढीचा अंदाज लागत नाही व दरामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे
वायदे बाजारातील बंदीमुळे शेतकर्यांना शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागत आहे. दरासाठी परिणामी त्यांना खासजी व्यापार्यांवरच अवलंबून रहावे लागते आहे यामुळे सोयाबीन व इतर पिकांची वायदे बाजारातील आणलेली बंदी तात्काळ मागे घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली.