
कर्मचार्याचा दारू पिऊन कार्यालयात राडा !
मुलगा गैरमार्गाला लागला आहे. त्याच्यात सुधारणा व्हावी म्हणून त्याला मंदिरात कर्मचारी म्हणून कामाला घ्या. चांगल्या संगतीत राहिला, तर त्यात सुधारणा होईल, अशा हेतूने पालकांच्या विनंतीवरून मुलाला मंदिरात देवस्थान व्यवस्थापनाने कामावर घेतले आणि त्याच मुलाने वारंवार वेगवेगळ्या विभागांत बदल्या केल्या जातात, या रागातून दारू पिऊन धारदार वस्तू घेऊन देवस्थान कार्यालयात राडा घातला
सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत असलेल्या या घटनेमुळे देवस्थान व्यवस्थापनाचा कारभार चव्हाट्यावर आला असून, अशी सुधारगृहाची भूमिका आळंदी देवस्थानच्या अंगलट आले आहे. ज्याला कुठे काम नाही, त्याला मंदिरात घेऊन त्यात सुधारणा करण्याच्या वृत्तीतून आत्तापर्यंत चार ते पाच जणांना देवस्थानने मंदिरात कामाला घेतले.
मात्र, त्यांच्यात सुधारणा तर दूर, वागण्यात देखील बदल न झाल्याने अखेर काही काळाने देवस्थान व्यवस्थापनाला त्यांना कायमस्वरूपी कामावरून काढून टाकावे लागले. मुळात चारित्र पडताळणी अहवाल असल्याशिवाय किरकोळ कामाला देखील मंदिरात कामगार नेमू नये, अशी मागणी आता वारकरी, भाविकांमधून होऊ लागली आहे.
दारू पिऊन राडा घालणार्या संबंधित तरुणाचा माफीनामा लिहून घेत त्याला पोलिस तक्रार न देता व्यवस्थापनाने सोडून दिले, हे त्या तरुणाच्या पुढील आयुष्यातील अडचणी न वाढण्यासाठी योग्यच होते. मात्र, पुन्हा कर्मचारी नेमताना विशेष काळजी घ्यावी, सर्व कर्मचार्यांचा चरित्र पडताळणी अहवाल घ्यावा, असा सूर आता भाविक आणि वारकर्यांमधून उमटत आहे.