
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी –
लोहा येथील शिवा संघटना प्रणित महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा.सुर्यकांत आणेराव तर स्वागताध्यक्ष पदी माजी नगरसेवक युवराज वाघमारे व कार्याध्यक्ष पदी पिंटू भाऊ वड्डे यांची सार्वानुमते निवड करुन सर्व कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
लोहा शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९४ वी जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात दि.७ मे २०२५ रोजी रोजी साजरी करण्यात येणार असुन त्यानिमित्त लोहा शहरातील व्यंकटेश गाॅर्डन येथे दि. ५ मे रोजी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
सदरील आढावा बैठकीत लोकशाही पध्दतीने सार्वानुमते २०२५ महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मंडळाची कार्यकारिणी प्रा. मनोहर धोंडे सर यांनी जाहीर केली ती पुढीलप्रमाणे
अध्यक्ष -प्रा.सुर्यकांत आणेराव , स्वागताध्यक्ष माजी नगरसेवक युवराज वाघमारे, कार्याध्यक्ष पिंटू भाऊ वड्डे, कोषाध्यक्ष अंकुश सोनवळे, सह कोषाध्यक्ष संजय कोटे, मन्मथ मुस्तापुरे, उपाध्यक्ष बालाजी गाजेवार, सतीश शेटे, सरचिटणीस बालाजी एकलारे, अंकुश आराळे, चिटणीस रविराज होळगे, प्रकाश कहाळेकर, मुख्य संघटक संग्राम मुस्तापुरे, नवनाथ दगडगावे, विश्वनाथ नेळगे, प्रसिद्धी प्रमुख विलास सावळे, शिवराज पाटील पवार, लखन महाबळे, विनोद महाबळे, माधव भालेराव, सिकंदर शेख, सोशल मीडिया प्रमुख सौरभ स्वामी, कल्याण वसमतकर,हरी वड्डे, राजकुमार पिल्लोळे, भिमाशंकर कारामुंगे, नागेश भाऊ, अरुण राईकवाडे, आकाश बेद्रे, सल्लागार लक्ष्मण कांजले, ज्ञानेश्वर घोडके, मुन्ना होणराव, रामदास आणेराव, मनोज शेलगावकर, मल्लिकार्जुन शेटे, माधव वसमतकर, बालाजी तांबोळी, मधुकर मुसळे, गुणवंत खिचडे, संजय अकोले, साधु पाटील वडजे, बालाजी स्वामी , ज्ञानेश्वर मानसपुरे, पांडु भुरे आदी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. मनोहर धोंडे सर म्हणाले की, लोहा शहरात शिवा संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९४ जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मी सार्वानुमते निवड केली त्यांचे मी अभिनंदन करुन शुभेच्छा देतो. शिवा संघटनेच्या वतीने २००८ पासून लोहा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती सलग १७ वर्षांपासून काढतोत. देशात महात्मा बसवेश्वर महाराज यांची शासकीय जयंती २००१ पासून सुरू झाली ती शिवा संघटनेमुळे. महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती लोहा शहरात नाही तर संपूर्ण राज्यात व देशात होते शिवा संघटनेचे ढाच्यात व साच्यात काम आहे. आम्ही धर्म पध्दतीने जयंती साजरी करतोत .
२४ वर्षांपासून देशात महात्मा बसवेश्वर जयंती सुरू झाली. यापुर्वी ८०० वर्षांपूर्वी का झाली नाही . देशात ग्रामपंचायती पासुन ते संसदेपर्यंत जयंती सुरू केली. भारतात महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले तिथे महात्मा बसवेश्वर जयंती सुरू झाली त्यानंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण राज्यात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती सुरू झाली. महाराष्ट्रात शिवा संघटनेच्या वतीने शेकडो ठिकाणी महात्मा बसवेश्वर महाराज चौक झाले, महात्मा बसवेश्वर महाराज यांचे पुतळे झाले, शालेय अभ्यासक्रमात महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अभ्यासक्रम सुरू झाला, महाराष्ट्रात शासनाने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ सुरू केले , मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक होत आहे ते शिवा संघटनेच्या पाठपुराव्यामुळे .
लोहा शहरात यंदा गेल्यावर्षी पेक्षा दो कदम आगे रेकार्ड ब्रेक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करुत असे प्रा. मनोहर धोंडे सर म्हणाले.
तसेच यावेळी शिवा संघटनेचे लोहा तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे यांचे ही भाषण झाले ते म्हणाले की शिवा संघटनेच्या वतीने दरवर्षी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येईल.