
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी
स्वराज्याच्या संकल्पक रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांची रथयात्रा लोहा शहरात दि .६ एप्रिल रोजी दाखल होणार असुन आयोजकांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या भव्य रथयात्रेची जय्यत तयारी केली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांनी दिली.
मराठा सेवा संघाच्या वतीने १८- मार्च ते १-मे दरम्यान महाराष्ट्रभर मराठा जोडो अभियान हे ब्रीद घेऊन जिजाऊ रथयात्रा फिरणार आहे.नांदेड मध्ये ही रथयात्रा दि.५- एप्रिल रोजी दुपार पासुन दि. ७-एप्रिल दुपारपर्यंत शहरासह विविध तालुक्यात फिरणार आहे.तर दि. ६-एप्रिल रोजी लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व ३३ कक्षाच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.दुपारी १२ वाजता ही रथ यात्रा लोहा येथे येणार आहे.
मराठा सेवा संघ महाराष्ट्रातच नव्हे जगभरात जिजाऊ,शिव,शाहु,फुले,आंबेकर विचार जनमाणसात रूजविण्याचे काम केले आहे. प्रबोधनाच्या माध्यमातुन अनेक लेखक,वक्ते,शाहीर, किर्तनकार निर्माण केले मराठा बहुजन समाजाला विविध विषयांवर सभा, काॅर्नर बैठकांच्या माध्यमातुन चर्चा करण्यासाठी आपापसातील संवाद वाढविण्यासाठी ही रथयात्रा महत्वाची ठरणार आहे.१८- मार्च रोजी शहाजी महाराज जयंती दिवशी भोसले गढी वेरूळ येथुन निघुन १- मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे लालमहल येथे समारोप होणार आहे.ही रथयात्रा नांदेड जिल्ह्यात शनिवार ५-एप्रिल रोजी दुपारी वसमत मार्गे,आलेगाव,निळा,तळणी मार्गे नांदेड शहरात येईल व मुक्काम असेल ६- एप्रिल रोजी नांदेड शहरातुन गुरूद्वारा, जिजाऊ सृष्टी सिडको तर दुपारी १२ वाजता लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथयात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी या रथयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे मराठा सेवा संघाचे बळीराम पवार, नामदेवराव कुट्टे, ,विठ्ठलभाऊ चव्हाण, हरिभाऊ चव्हाण मराठा सेवा संघ लोहा तालुकाध्यक्ष शाम नळगे प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट,सतिश चव्हाण मुकदम बी डी जाधव लक्ष्मण आनकाडे ऋषिकेश जोगदंड दामोदर वडजे अर्जुन मोरे अर्जुन शिंदे अशोक कदम,माधव पवार, सुरेश मोरे अंकुश कोल्हे लोहा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे कंधार तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे किशन काळे किशनराव मोरे संजय जाधव परमेश्वर खोसे, जिजाऊ ब्रिगेड च्यालोहा तालुकाध्यक्षक्षा वर्षाताई जाधव,यांच्यासह मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व ३३ कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.महाराष्ट्रभर फिरणाऱ्या या जिजाऊ रथयात्रेतुन नक्कीच सर्वंच चळवळींना बळ मिळेल व ऊर्जा मिळेल. अशी माहिती संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांनी दिली.