दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी –
लोहा शहरातील जायकवाडी वसाहतीची जमीन भूमाफियाशी मिलिभगत करुन हडप करणाऱ्या कार्यकारी अभियंता गरुड यांची ईडी चौकशी करून चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी लोहा येथील पॅथर नेते तथा मा. नगरसेवक बबनराव निर्मले व मा. नगरसेविका सौ.शारदाताई बबनराव निर्मले यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
पुढे निवेदनात असे नमूद केले की,
3 हेक्टर 17 आर जायकवाडी वसाहत येथे भूसंपादन प्रकरणाचा 2/3 रकमेचा दावा कोर्टात चालू असताना मूळ मालकांनी विक्री केलेल्या थर्ड पार्टी भूमाफिया, शासकीय जमिनी हडप करणाऱ्या टोळी सोबत सोबत संगणमत करून भूभाडे पोटी 13,500,0000 तेरा कोटी पन्नास लक्ष रुपये सुप्रीम कोर्टात अपील न करता थर्ड पार्टीस चेक द्वारे / धनादेशाद्वारे अदा करून शासनाची फसवणूक व लुबाडणूक केल्याप्रकरणी लाचखोर भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता श्री. गरुड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अदा केलेले तेरा कोटी पन्नास लाख रुपये वसूल करून त्यांना तत्काळ निलंबित करून त्यांनी जमवलेल्या बेहिशोबी मालमत्तेची ईडीमार्फत चौकशी करावी .
मौजे लोहा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील सर्वे नंबर 114 (क्षेत्र 3 हे 17 आर) मधील जायकवाडी वसाहतीसाठी शासनाने सरील सर्वे नंबर मधील 3 हेक्टर 17 आर जमीन संपादित करण्या करिता रीतसर शासनाच्या नियमाप्रमाणे वसाहतीसाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया करून जमिनीवर रीतसर ताबा घेतला आणि व मावेजा पोटी मूळ मालक श्री. उपेंद्रराव कुलकर्णी यांना 20.00000 वीस लक्ष रुपये अग्रिम दिले आणि 2/3 रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु रक्कम जमा न केल्यामुळे वसाहतीसाठी एवढी जमीन आवश्यक नसल्यामुळे 1 हेक्टर क्षेत्र संपादित करून उर्वरित क्षेत्रा संबंधित शासनास कळवून मावेजा देण्यासाठी पाठपुरावा चालू केला परंतु मूळ मालकाने सदरील सर्वे नंबर 114 क्षेत्र 3 हेक्टर 17 आर जमीन कार्यालयास व शासनाला कसल्याही प्रकारची माहिती न देता अंधारात ठेवून लोहा येथील. बी -बीयाणे विक्रेते दिगांबंर कोटलवार व इतर बाहेर गावचे भूमाफिया शासकीय जमीन हडप करणारे चार लोकांसोबत दि. 29-2-2014 रोजी जमीन परस्पर विक्री केली या संबधीत सदरील व्यक्तीवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर लोहा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याऐवजी किंवा उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्याऐवजी आरसीएस 32/2015 प्रमाणे दिवानी दावा दाखल करून विक्रेत्यांना व मालकांना ंअभय देण्याचे काम वेळोवेळी पाटबंधारे कार्यालयाकडून झाल्याचे दिसून येते सदरील दाव्यासंबधी कुठलाही पाठपुरावा न करता जैसे थे प्रकरण ठेवून जाणिवपूर्वक हेतू पुरस्करपणे शासनाची दिशाभूल केली असल्याची दिसून येते हे आरसीएस दावा क्रमांक 32/2015 चालू असताना मूळ मालक व जमीन खरेदी केलेले भूमाफियांनी प्रकरणांचा निकाल लागण्याआधीच किंवा न्यायालयाचा निकाल लागण्या आधीच रिट याचीका क्रमांक 6312/2015 दाखल केली या रिट याचिकेचा पाठपुरावा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर कार्यालय कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग क्रमांक 7 गंगाखेड जिल्हा परभणी यांनी कसल्यास प्रकारचा पाठपुरावा केला नाही किंवा शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिले नाही. याचा अर्थ असा होतो की ही जमीन आपली जहागीरी समजून ही सर्व मंडळी भूमाफिया शासकीय जमीन हडप करणाऱ्या टोळीकडून करोडो रूपयांची लाच घेऊन गप्प बसले व शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून अनियमितता केली व उलट थर्ड पार्टी खरेदीदार दिगबंर कोटलवार व त्यांचे भूमाफिया साथीदारासोबत संगनमत करून भूभाडे पोटी 13 कोटी 50 लक्ष रूपये सुप्रीम कोर्टात अपील न करताच थर्ड पार्टीस धनादेशाद्वारे अदा करून शासनाची फसवणूक व लुबाडणूक केली तेव्हा त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अन्यथा विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पॅथर नेते तथा मा.नगरसेवक बबनराव निर्मले व मा.नगरसेविका सौ. शारदाताई बबनराव निर्मले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, मुख्य अभियंता यांना, पोलीस आयुक्त आदींना पाठविल्या आहेत.