
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (टेंभुर्णी):- सालाबाद प्रमाणे याही वर्षी नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने शिखर शिंगणापूर कावड यात्रेसाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.यामध्ये चिवडा, लाडू, चहा व थंड पिण्याचे पाणी देण्यात आले.
यावर्षी ८ एप्रिल २०२५ रोजी शंभू महादेव यात्रा शिखर शिंगणापूर येते संपन्न होणार आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शंभू भक्त हे शिखर शिंगणापूर येथे पायी चालत जात असतात विदर्भ,मराठवाडा, येथून हजारो भाविक हे टेंभुर्णी शहरातून यात्रेसाठी पायी चालत जात असतात.गेल्या ११ वर्षापासून नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी अल्पोपार वाटप करण्यात येतो. याही वर्षी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ब्रह्मदेव गायकवाड, प्रमोद पवार, सुरज गायकवाड, अभिषेक गायकवाड, आकाश पवार, युवराज गायकवाड, पृथ्वीराज शिंदे यांनी पहाटे ४ ते सकाळी ९ यावेळेत भाविकांना अल्पोपराचे वाटप केले.