
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
या शासनाच्या उपक्रमाने मुलांना शाळेत आनंददायी पद्धतीने शिक्षण घेताना होतं मदत पालकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील यशवंत विद्यालयात आनंददायी शनिवार या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ताणतणाव कमी करून, मनोरंजनात्मक कलेतून विद्यार्थ्यांना विविध हस्तकलीचे धडे अध्यापनातून दिले जातात. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून यावेळी विद्यार्थ्यांनी रंगीत पेपरच्या सहाय्याने सुंदर रंगीबेरंगी फुले साकारले.
विद्यालयात रंजक व आनंददायी शिक्षण मिळण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याची अंमलबजावणी व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त कलेतून खेळातून पर्यटनातून प्रात्यक्षिकातून, निर्मितीतून बौद्धिक व मानसिक आनंद मिळावा. कौशल्य मूल्य रुजवावे या हेतूने हस्तकलेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
कागदी फुले साकारताना मुलांना अल्हाददायक असीम आनंद घेता येतो.
सजवटीसाठी विशिष्ट रंगीबेरंगी फुलांची आवश्यकता असते अशावेळी कागदी फुलांचा वापर करू चांगले सजावट करता येईल या उद्देशाने सदरील उपक्रम घेण्यात आले.यावेळी
साक्षी पारेकर,श्रेया पौळ,आनंदी बंडे, स्नेहा काटे, वैष्णवी भगनुरे,राजनंदनी सुरनर, मंजुषा मुंडे,योगिता कुसनुरे, प्रियदर्शनी पासमेल,राधिका मेकले,राखी कांबळे, वैष्णवी करळे, अंजली सांगूळे, शाहिस्ता पठाण, जागृती स्वामी,राधिका शिवपुजे,वैष्णवी शिवपुजे,दिव्या हामणे, भावना साखरे,प्रांजली नाळापुरे, खुशी राऊतराव,धनश्री चाटे श्रुती चंदे, श्रुती ढाकणे, प्रतीक्षा कवाणकर,पुनम वाघमारे,अंकिता सुवर्णकार,राधिका बटावले, दीपक ढाकणे, योगीराज ढाकणे,विरेन गुंडरे, वेदांत झुकुले, रत्नाकर भिकाणे, अरमान सय्यद, प्रसाद कोटलवार, संदेश मुंडे, अथर्व कासले, साईनाथ गुट्टे,अक्षरा मठपती आदि विद्यार्थ्यांनी सुरेख फुले साकारली.
शनिवार व रविवार सुट्टीचा काळात सर्जनशील प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी कागदी फुले आणि पाने बनवून सुंदर फुलदाणी तयार करावे यासाठी कला शिक्षक महादेव खळुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके,उपसचिव डॉ. सुनिताताई चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी आदिनी कौतुक व अभिनंदन केले.