
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड देगलूर:
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज देगलूर शहरातील आ.जितेश अंतापूरकर यांच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण होते. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत भारत मातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदराने वंदन केले. त्यानंतर ‘वसा राष्ट्रसेवेचा • संकल्प प्रगतीचा • वारसा संस्कृतीचा’ या ब्रीदवाक्याचा जयघोष करत ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. त्यांनी राष्ट्रसेवा, विकास आणि भारतीय संस्कृतीच्या जतनसाठी पक्षाने केलेल्या कार्याचा उल्लेख केला. तसेच, कार्यकर्त्यांना याच निष्ठेने आणि उत्साहाने पुढेही काम करण्याचे आवाहन आ.अंतापूरकरांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. ‘वसा राष्ट्रसेवेचा • संकल्प प्रगतीचा • वारसा संस्कृतीचा’ हे केवळ घोषवाक्य नसून तो प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवनाचा आणि कार्याचा आधार आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
दरम्याण आमदार कार्यालयात श्रीराम नवमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून रामलल्लाच्या मूर्तीची आ.अंतापूरकरांच्या हस्ते पूजा करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभाग घेतला आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक झाले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचा आणि श्रीराम नवमीचा हा दुहेरी उत्साह देगलूर शहरात दिसून आला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात अधिक जोमाने आणि एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार आ.अंतापूरकरांनी व्यक्त केले. एकूणच, देगलूर शहरातील भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आणि रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
—– —– —- —–
देगलूर शहरातील कार्यालयात भाजप स्थापना दिना निमित मजबूत संघटन ऑनलाइन कार्यकर्ता संमेलन कार्यक्रम आ.अंतापूरकरांच्या कार्यालयात प्रोजेक्टेव्दारे असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी,नेतेमंडळीनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन ऐकले
देगलूर ता. शाहपूर येथे, रामनवमी चा शुभ मुहूर्तावर “स्थानिक आमदार विकास निधीतून श्री राम मंदिर सभाग्रहाचे बांधकामाचे लोकार्पण व तसेच सभा मंडपाच्या बांधकामाचे भूमी पूजन करण्यात आले” या वेळी भागातील पदाधिकारी गावकरी तसेच भक्तगण उपस्थित होते..