
दैनिक चालु वार्ता शिराढोण प्रतिनिधी : गजानन देवणे
लॉर्ड व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूल कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिराढोणचे सरपंच तथा भीमाशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य खुशाल पाटील पांडागळे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेड साहेब ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे साहेब ,मोहीम अधिकारी सचिन कपाळे तसेच मंचावर शिराढोणचे तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव आप्पा देवणे, माजी सरपंच गणपतराव अप्पा देवणे होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व सायन्स फाउंडेशन दिल्लीतर्फे घेतल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाड व ब्रेन डेव्हलपमेंट एक्झामिनेशन या परीक्षेत अनुक्रमे 22 IMO व 5 BDS असे गोल्ड मेडल मिळवून लॉर्ड व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जणू आकाशाला गौशनी घालण्याचे यश प्राप्त केले असल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अनेक गीतावर नृत्य सादर केले व विशेष म्हणजे छावा चित्रपटातील नृत्य सादर करून आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन शिराळे व नाजमा मुंजेवार तसेच 5th क्लास च्या विद्यार्थिनी अनवी देवणे व श्रद्धा पांडागळे यांनी केले. आभार प्रदर्शन शितल पांडागळे यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहशिक्षक गजानन शिराळे, संतोष कुंभारे, शितल पांडागळे, शिवकन्या चावरे, कपाळे मॅडम, नाजमा शेख, आसमा मोमीन, प्रणिता नांदेडे, शिवानी नरंगले, मंगल ताई, अशोक घोरबांड, पांडुरंग कपाळे आदींनी परिश्रम घेतले.