
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- परिसरात दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी अतिवृष्टी होऊन सुद्धा उस्माननगर ता.कंधार येथे ओढे , नदी, नाले कोरडे पडल्यामुळे जनावरां बरोबर माणसांना सुध्दा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे. अजून उन्हाळ्याला आडीच ते तीन महिने शिल्लक आहे. भविष्यात काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर व परिसरात पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे.
मागील दहा वर्षी पूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना मंजूर करून चिंचोली येथे विहीर बांधून पाणी उस्माननगर,शिराढोण भुत्याचीवाडी अशी संयुक्त पाणी पुरवठा योजना उदयास आली.पण ही योजना केवळ नावालाच उरली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून गावा गावात पाइपलाइन खोदून नळ कनेक्शन दिले. पण पाणी काही भरपूर प्रमाणात मिळाले नाही. गावच्या वरच्या भागात पाण्याची पातळी खोल गेल्याने( लहान मोठे)नागरिकांना चिमुकल्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर अनेक पाणीदार वर्गाने पाणी विकण्याचा धंदा सुरू केला आहे. पैशाने पाणी विकत घेऊन ग्रामस्थ आपली तहान भागवीत आहेत. ज्या ठिकाणाहून पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन आहे. त्या रस्त्यावरील रस्ता खोदून पाईप लाईन खराब झाली आहे. आलेगाव ता.कंधार येथील टि पाॅईट ठिकाणी रस्ता खोदून पाईप लाईन खराब झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी महीलासह चिमुकल्याना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे