
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- निपून महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांचा बौध्दीक विकास व्हावा व सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडावेत. सर्व वर्गातील समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने निपून महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मार्च ते जून या
महिण्यात कमजोर विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य या उपक्रमात करावयाचे आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या क्षमता चाचण्या घेण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दि.५ मार्च रोजी कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत चावडी वाचनासाठी उस्माननगर
ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी माणिक शेषेराव काळम, अशोक काळम, मैनादीन फकीर, शिवदास डांगे, गोळेगावकर, शिवानंद काळम आदी मान्यवर या चावडी वाचनासाठी उपस्थित होते. शाळचे
मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी योग्य नियोजन आखून चावडी वाचन घेतले. यावेळी सर्व शिक्षकांनी अनमोल सहकार्य केले. यावेळी मन्मथ केसे, नितीन लाठकर, भगवान राक्षसमारे, शकील शेख,
मनिषा भालेराव, रोहिणी सोनकांबळे, देविदास डांगे आदी शिक्षण उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी चावडीवाचनात अत्यंत उत्कृष्टरीत्या वाचन केले. या सर्व विद्याथ्यांचे, गायकन्यांचे अभिनंदन करण्यात आले.