
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी –
दिनांक ५ एप्रिल परभणी जिल्हयात अचानकपणे आलेल्या अवकाळी वादळ, वारे व पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतातील पिकांचे पंचनामे त्वरीत करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी खा ॲड सुरेश जाधव यांनी
परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे दि 03.04.2025 रोजी परभणी जिल्हयात बऱ्याच सर्वदूर भागात अचानकपणे आलेल्या वादळ, वारे व अवकाळी पाऊस काही प्रमाणात गारपीट यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे गहू, ज्वारी, करडई, फळबागा ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरीत पंचनामे करुन जिल्हयातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी. अशी मागणी माजी खासदार तथा शिवसेना संपर्कप्रमुख ॲड सुरेश रामराव जाधव पाटील यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे