
दैनिक चालु वार्ता देहूगांव प्रतिनीधी –
देहूगांव
येलवाडीच्या उत्सव कमिटीने चांगल्या प्रकारचा घाट उपलबद्ध करून दिलेला आहे.बैलगाडा मालक जेंव्हा आशा ठिकाणी आपली आपला बैलगाडा घेऊन जातो तेंव्हा आपल्या बैलाला कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेत असतो.त्यामुळे अनेक बैलगाडा मालक आपले बैलगाडी घेऊन या ठिकाणी आले आहेत ,प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित असून त्यांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिल्याने हा घाट गर्दीने फुलून गेला आहे. परंतु आशा बैलगाडा शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण करू नये. कारण लाईव्ह प्रक्षेपण केले तर सर्वजण घरात बसून बैलगाडा शर्यती पहातील , आणि घाटात फक्त बैलगाडा मालक आणि आयोजक कमिटीच दिसेल. त्यासाठी बैलगाडा शर्यतीचे प्रक्षेपण करू नये असे आवाहन खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी यावेळी केले
तीर्थक्षेत्र येलवाडी गावचे ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज यांचा उत्सवा निमित्त येलवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.या शर्यतीती १८० बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता.त्यात २५ बैलगाडे अंतिम फेरीत आले.त्यातून पहिला दुसरा ,तिसरा असे नंबर काडुन त्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.खेडचे माजी आमदार दिलीप मोहीते यांनी या ठिकाणी भेट दिली असता ते यावेळी बोलत होते.
ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराज उत्सवा निमित्त पहाटे ५ ते ७ श्री रोकडोबा महाराजांचा अभिषक व आरती ,सकाळी ७ ते ८ मांडव ढहाळे व हारतुरे ,सकाळी ८ वाजल्या पासून भव्य बैलगाडा शर्यतींना सुरुवात झाली होती. आहे.सायंकाळी ६ वा.रोकडोबा महाराजांची आरती ,सायंकाळी ६ : ३० ते ८ श्री रोकडोबा महाराजांचा ( छबिना ) पालखीची ग्राम प्रदक्षिणा ढोल ताशांच्या गजरात कडण्यात आली. त्यानंतर रात्री ८ वाजता खास लोकमनोरंजना साठी गौतमी पाटील यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.त्यास प्रेक्षकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला
श्रीक्षेत्र येलवाडी रोकडोबा महाराज उत्सव समितीचे विध्यमान सरपंच रणजित गाडे , विनोद गाडे ( अध्यक्ष ) दत्तात्रय बोत्रे ( उपाध्यक्ष ),वैभव गाडे ( खजिनदार ),प्रशांत गाडे ( सदस्य )अक्षय गाडे , सुनील राऊत ,सौरभ गाडे ,तुषार गाडे ,विकास गाडे,बाळासाहेब गाडे ,हरेश गाडे ,संदीप पायगुडे ,शरद गाडे ,आदित्य गाडे ,महेश गाडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.हा श्री रोकडोबा महाराज उत्सव रोकडोबा महाराज उत्सव समिती ,व समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र येलवाडी यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी लहान लहान बैल देखील असतात.आणि प्रत्येकाची अपेक्षा असते की या घाटात आपले नाव निघाले पाहिजे.आणि त्यासाठी वाटेल ते करायची आपली तयारी असते.परंतु हे करीत असताना परमेश्वराची कृपा देखील आपल्या पाठीशी असायला पाहिजे.आपला बैल हा नंदी आहे.आणि नंदी परमेश्वराचा अवतार आहे.त्याला कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.आपण जेव्हा नंदीला मारतो ,तेंव्हा साक्षात परमेश्वराला मारल्या सारखे आहे.बैलांना कोणीही मारू नये याची नोंद घ्यावी असे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.