
दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :-तालुक्यातील धाडी येथील पाझर तलाव क्र ३ मध्ये सुरु असलेले बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता, फसवणूक आणि भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप भाजप युवा मोर्चा आष्टी तालुकाध्यक्ष अनिरुद्ध दंडाळे यांनी दै. चालू वार्ता मध्ये प्रकाशित झालेल्या बातमी द्वारा दखल घेऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करत दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली
निवेदन करते स्वतः अनिरुद्ध दंडाळे धाडी गावातील रहिवासी असून असून, त्यांच्या शेतीचे क्षेत्र तलावापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. याच तलावावर ३०० ते ४०० हेक्टर शेतीचा थेट परिणाम होतो त्यामुळे त्यांनी दैनिक चालू वार्ताच्या बातमीची दखल घेत स्वतः बांधकामस्थळी भेट देऊन पाहणी केली. व्हिडिओद्वारे त्यांनी या कामाची वस्तुस्थिती दाखवली आहे, जिथे फक्त लाकडी दांड्याने मारताच काँक्रीटचा थर तुटून ढेकळ्यासारखा खाली पडतो. या काँक्रीटमध्ये माती, निश्चित डस्ट आणि कमी दर्जाच्या सिमेंटचे मिश्रण वापरल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हे काम शेतकऱ्यांच्या हक्कांची थट्टा करणारे आहे असे म्हटले आहे शिवाय
अनिरुद्ध दंडाळे यांनी प्रशासनाकडे जोरकस मागणी लावून धरली आहे सदर बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे अशी आग्रही मागणी केली आहे शिवाय या बांधकामाचे
तांत्रिक निरीक्षण त्वरित करण्यात यावे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी संबंधित अधिकाऱ्यांकडून जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्यात यावी दंडाळे यांच्या माहितीनुसार रुद्र नावाचे कुणीतरी अधिकारी यामध्ये सलग्न असतील, तर त्यांच्यावर सुद्धा चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यासाठी आमदार सुमित वानखेडे यांच्याकडे प्रामुख्याने करणार आहेत असे निवेदनात म्हटले आहे पुढे दंडाळे नमूद करतात की सदर बांधकाम आमदार सुमित वानखेडे यांच्या कार्यक्षेत्रात येते. यावर बोलताना दंडाळे म्हणाले –” दादा हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहेत. याची योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास, ते नक्कीच त्वरित आणि कठोर कारवाई करतील, असा मला विश्वास आहे.”हा प्रश्न केवळ कामाच्या गुणवत्तेचा नाही, तर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्याचा आणि जनतेच्या पैशाचा आहे. आम्ही खपवून घेणार नाही. आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे,” असा ठाम इशारा अनिरुद्ध दंडाळे यांनी दिला आहे.