
दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी -भारत पा सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर):-तालुक्यात शिऊर बंगला येथे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व गो हत्या बंदी यासाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी आंदोलकांनी प्रलंबित असलेले प्रश्न मांडले शेतीमालाला उत्पन्नाच्या दिडपट हामी भाव, सरसकट शेतकरी कर्ज माफी, नदी जोड़ प्रकल्प करून शेतीला पाणी देण्यात यावे,आज पर्यंत उत्पन्न खर्चाच्या आधारे दिड पट हमी भाव न दिल्यामुळे शेतकरी यांचे लाखों रूपये सरकारकडे बाकी आहे ते व्याजासह परत करा, पिक विमा संदर्भात चार कव्हरेज रद्द करण्याचे सरकारणे ठरवले आहे तो जिआर रद्द करून पुर्वी प्रमाणेच नियम ठेवावा व २०२४/२०२५ चा पिक विमा तात्काळ शेतकरी वर्गाच्या खात्यात जमा करावा, डोगरथडी भागात अनेक बिबटे आहेत त्यांचा बंदोबस्त करा व मृत व्यक्तींच्या नातेवाईकाना ५०लाखाची मदत तात्काळ करा व हल्ल्यातील जखमी व्यक्तिना १०लाखाची मददत करा, गोवंश हत्या बंदी कायदा झाला पण गो हत्या थांबलेली नाही ती तातकाळ थांबविण्यात यावी व वैजापूर सह महाराष्ट्रातील कत्तल खाणे बंद करण्यात यावे इत्यादी मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील यानी सागितले कि जर मागण्या मान्य झाल्या नाहीतर आमदार,खासदार,मंत्री याना गाबंदी केली जाईल या आंदोलना वेळी प्रकाश ठुबे, भगवान घोगरे,बाळा पाटील जाधव,नानासाहेब सुर्यवंशी,माणिक निघोटे, रामेश्वर साळुंके सर, प्रशांत निकम, संतोष गोरे,अतुल आढाव, जालींदार नागुडे,अजय मोटे,नवले पाटील, अर्चना अजय पाटील यांनी तिव्र शब्दात सरकारचा निषेध केला या वेळी लांबच लांब वाहानाच्या रांगा लागल्या होत्या आंदोलन ठिकाणी रामनवमी देखील साजरी करण्यात आली मागण्याचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक वैभव रणखाब यांना देण्यात आले या ठिकाणी पोलीस बांधवानी चोक बंदोबस्त ठेवला होता.