
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम/रिसोड -भागवत घुगे
रिसोड : अकोला – वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नाबार्ड च्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा योजना राबवित आहे. रिसोड तालुक्यातील वाकद शाखेचे खातेदार कै. संतोष प्रल्हाद पैठणकर यांचा दुर्दैवी अपघाती मुत्यु झाला. ह्या घटनेची माहिती वाकद शाखेचे शाखाधिकारी धिरज बाजड यांना मिळाल्या नंतर त्यांनी खातेदाराच्या नातेवाईकाना बोलवून सदर खातेदाराची PMSBY ( प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना) अपघात विम्याची 2 लाखाची पॉलिसी काढली आहे ह्याची माहिती दिली. तसेच क्लेम फॉर्म भरून घेऊन / सर्व कागद पत्राची पूर्तता करून घेऊन क्लेम प्रकरण मुख्य कचेरीच्या हिशेब व बँकिंग विभागाचे प्रफुल पाटील यांच्या कडे पुढील कार्यवाही कडे पाठविण्यात आले.
बँकेने कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर PMSBY ( प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ) (Accidental Insurance) अपघात विम्याची 2 लाख रुपयाची रक्कम मंजुर करण्यात आली. 2 लाख रुपयाचा धनादेश अपघातातील मृत कै. संतोष प्रल्हाद पैठणकर यांच्या पत्नी श्रीमती रंजना संतोष पैठणकर यांना बँकेचे संचालक आ अमित झनक यांचे हस्ते, दामोधरजी मोरे, कुकाजी पाटील हाडे, प्रशांत पाटील हाडे, डीगांबरराव मवाळ सर, विष्णू शंकर मापारी, शेख गुलाबभाई शेख सिकंदर, दीपक तिरके, पत्रकार उद्धवराव जटाळे, वाकद से. स. सो अध्यक्ष मनोहर चोपडे, थोडंप से. स. सो अध्यक्ष तथा सरपंच स्वप्निल बोडखे, बाळखेड चे सरपंच सचिन पऱ्हाड, तसेच शाखाधिकारी धिरज बाजड अणि सर्व कर्मचारी वाकद शाखा व उपस्थित गावकरी यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
पतीच्या निधनाने कुटुंबातील कर्ता व्यक्ति गमावल्या गेलामुळे आर्थिक संकटाचा प्रश्न खातेदारच्या वारसदारा पुढे निर्माण झाला होता परंतु बँकेकडून प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळाल्याने संसारास हातभार लागणार असल्याने खातेदारच्या वारसदारा कडून बँकेचे, संतोष दादा कोरपे, संचालक मंडळ आणि बँकेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांचे आभार व्यक्त केले. अपघात विमा जास्तीत जास्त खातेदारांनी सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान बँकेचे मा. संचालक आ. अमित झनक यांनी केले. तसेच या कार्याचे जिल्हाभर बँकेचे कौतुक होत आहे.