
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुके
अंबड : धनगर पिंपरीतील श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले मंदिरात भव्य सजावट करण्यात आली होती. सकाळी प्रभू रामचंद्रांना पूजा व अभिषेक त्यानंतर ह.भ.प श्रीहरी महाराज रसाळ यांचे कीर्तन उत्साहात पार पडले त्यानंतर दुपारी बारा वाजता मंदिरामध्ये विधिवत पूजन जन्मोत्सव किर्तन, आरती, पाळणा, गायन गाऊन गुलालाची उजळण पुष्परष्टी करत जन्मोत्सव साजरा करण्यात दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा मंदिरात उत्साहात वाजतगाजत पार पडला आहे. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणं चढवण्यात आली आहेत. भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिरात काटेकोर व्यवस्थापन करण्यात आले होती व.
धनगर पिंपरीच्या ऐतिहासिक मंदिरात रविवार (दि.6) आज पहाटेपासूनच भाविकांनी रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. काकड आरती नंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आले होते . तर दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
प्रभू सीयावर रामचंद्र की जय अंबड धनगर पिंपरी: चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. यानिमित्त प्रसिद्ध श्री राम मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईमुळे उजळून निघाला आहे.धनगर पिंपरी येथील
चैत्र शुद्ध नवमीला रामजन्म
चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या ‘प्रभू रामचंद्राचा’ जन्म झाला. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. ज्याप्रमाणे श्री कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला.
रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायला जातो. या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते. आज श्रीहरी महाराजांचा हरी किर्तन रामनवमीचा उत्सव पार पडली
रामजन्मोत्सवात धनगर पिंपरी मधील श्री राम मंदिरात श्रीरामाला सोन्याच्या मिशा, काय आहे परंपरा?
धनगर पिंपरी च्या ऐतिहासिक राम मंदिरात रामनवमीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा होत आहे. पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर गावकऱ्यांकडून भाविकांच्या गर्दीचा अंदाज बघता काटेकाेरपणे व्यवस्था करण्यात आली होती