
दैनिक चालु वार्ता जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
दि .६ (पुरंदर) जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक संघटनेचे अध्यक्ष (जिमा) डॉ.रामदास कुटे यांनी ठेकेदारांच्या जिसा संघटनेवर ब्लॅकमेलिंग करणे,खंडणीची पूर्वतयारी तसेच कारखानदारांना गेटवर जाऊन धमकावण्याचे प्रकार करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले डॉ.कुटे यांच्या वक्तव्याचा निषेध करत जिसा संस्थापक सुरेश उबाळे ,अध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १००अधिक भूमीपुत्रांनी रविवारी(दि६) पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत बिनबुडाचे व खोटे आरोप करणाऱ्या जिमा अध्यक्ष डॉ कुटे यांच्यावर बदनामी ,मानहानीचा गुन्हा दाखल करा अशा आशयाचा तक्रार अर्ज सहा.पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांना देण्यात आला.
शनिवारी (दि.५)जिमा संघटनेचे अध्यक्ष उद्योजक डॉ .कुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्यांना विविध सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांची जिसा संघटनेवर गंभीर आरोप करत औद्योगिक वसाहतीमध्ये विनाकारण फिरकू देणार नाही असा सज्जड दमवजा इशारा दिला होता.प्रसार माध्यमांवर हे वृत्त प्रसारीत होताच जिसा संघटनेचे पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले शहरातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या . गेल्या दहा वर्षात आम्ही कधीही कोणत्याही कारखानदाराला धमकावले नाही .किंवा कामासाठी दबाव टाकला नाही तसेच पैशांची मागणी केली नाही जर त्याचे पुरावे देऊन आरोप सिद्ध केले तर आमच्यावर गुन्हे दाखल करावेत.येथील कारखानदार ,कामगार आणि सेवा पुरविणारे ठेकेदार यांच्या समस्या ,अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही जेजुरीकर ग्रामस्थ सक्षम आहोत. असे संदीप जगताप यांनी सांगितले .तर डॉ.कुटे यांच्या कंपनीमध्ये काय व कोणत्या सोयी सुविधा दिल्या जातात त्यांचे येथे प्लॉट किती आहेत?याचीच चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे संस्थापक सुरेश उबाळे यांनी सांगितले . यावेळी संपत कोळेकर ,महेश उबाळे ,विक्रम फाळके, अक्षय जगताप ,आप्पा चौंडकर ,विनायक कुडाळकर ,लहू शिंदे,उमेश जगताप,प्रशांत गायकवाड , हरिभाऊ पवार ,विकास पवार ,मयूर लाखे नजीर शेख ,अभिजित काकडे ,,विजय पवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
बुधवारी (दि.९)उद्योगमंत्र्याबरोबर बैठक —
डॉ.रामदास कुटे यांची येथे मनमानी सुरू असून ते कोणालाही न जुमानता बेछूट व खोटेनाटे आरोप करून येथील वातावरण दूषित करत आहेत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे जिसा संघटनेच्या पदाधिकर्यांनी सांगितले
फोटो खालील ओळ —- डॉ.रामदास कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देताना जिसा पदाधिकारी