
दैनिक चालु वार्ता जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
दि.५ ( पुरंदर ) जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांश कारखानदार छोटे मोठे उद्योजक हे मराठी आहेत .त्यांची बांधिलकी या शहराशी जोडलेली आहे . स्थावर मालमत्ता ,दागदागिने तारण ठेवून , बँकांची कर्जे काढून येथील उद्योजकांनी कारखानदारी उभी केली आहे. त्याचबरोबर कोणतीही गुंतवणूक करून न घेता स्थानिक भूमिपुत्रांनाच येथील कारखान्यात विविध सेवा पुरविण्याचे ठेके देण्यात आले आहेत मात्र , ठेकेदारांच्या जिसा संघटनेचे पदाधिकारी विविध कारखान्यामध्ये जाऊन बेकायदेशीरपणे पत्राद्वारे माहिती मागत आहेत , तसेच कंपनी व्यवस्थापनावर दबाव टाकत आहेत. ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार होत असून भविष्यात खंडणी मागण्यांची पूर्वतयारी असल्याचे दिसून येते.त्यामुळे सर्व कारखानदारांमध्येअस्वस्थता पसरली आहे . सेवा पुरविणारे ठेकेदारांची जिसा आणि उद्योजकांची जिमा या संघटना लहान मोठ्या भावाप्रमाणे कार्यरत होत्या मात्र काही असंतुष्ट लोक जिसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून येथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत .भविष्यात असले प्रकार जेजुरी एमआयडीसी मध्ये खपवून घेतले जाणार नाहीत.जर कोणी दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल तर वेळ पडल्यास उद्योजक कारखाने बंद ठेवतील याची सर्व जबाबदारी प्रशासन व्यवस्थेची असेल . लवकरच मुख्यमंत्री , उद्योगमंत्री ,जिल्हा पोलीस अधीक्षक ,जेजुरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात येतील असा इशारा जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार व उद्योजक संघटनेचे (जिमा ) अध्यक्ष डॉ .रामदास कुटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे.
जिसा संघटनेच्या वतीने शनिवारी (दि.५) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्योजक पांडुरंग सोनवणे ,रवींद्र जोशी ,शकील शेख ,राजेश पाटील , प्रकाश खाडे , जालिंदर कुंभार आदी उपस्थित होते .
यावेळी डॉ.कुटे म्हणाले की , येथील जिसा संघटनेतील सदस्यांनाच विविध कपन्यांमधून सेवा पुरविण्याचे ठेके दिले आहेत .परंतु त्यांचीही काही जबाबदारी आहे .पुढील काळात कारखाना गेटवर जाऊन किंवा व्यवस्थापनाकडे जाऊन बेकायदा पत्रे देणे त्यांना दबावाखाली घेणे असे प्रकार झाल्यास औद्योगिक वसाहतीमध्ये वावरण्यास प्रतिबंध घालण्यात येतील येथील कारखानदार नेहमीच कामगारांचे हित पहातो ,त्यांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करतो मात्र ,ही माहिती मागण्याचा जिसा संघटनेला कोणताही अधिकार नाही तसेच ही संघटना कोठेही प्रसासकीय नोंदणीकृत नसल्याचेही सांगितले.
त्यासाठी प्रशासन व्यवस्था आहे त्यांना हवी ती माहिती देऊ असेही ते पुढे म्हणाले.
@#@@@@@@@
कामगार कारखानदार ,स्थानिक भूमीपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी बांधील -संदीप जगताप
येथे कार्यरत असलेले कारखानदार ,कामगार आणि स्थानिक भूमीपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी जिसा संघटना बांधील असून गेल्या काही वर्षांपासून येथे समस्या व अडीअडचणी सोडविण्याचे काम जिसा करत आहे.कधीही कुणाला धमकवण्याचे वा ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार घडले नाहीत किंवा सदस्यांवर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत .संविधानिक पद्धतीने माहिती मागण्याचा अधिकार आमचा असून तशी पत्रे कारखाना व्यवस्थापनाला देण्यात आली आहेत.जर कोणाला यामध्ये गैरप्रकार जाणवत असतील तर त्यांनी कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा आम्हीही पुढील आठवड्यात स्थानिक लोकप्रतिनिधी (आमदार )व राज्याचे उद्योगमंत्री यांची भेट घेणार आहोत असे जीसाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले ,
कारखानदारांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार केल्यास गुन्हे दाखल करणार -डॉ.रामदास कुटे