
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी-राजेंद्र पिसे
माळशिरस प्रतिनिधी
नातेपुते : अकलूज येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार पडली या बैठकी दरम्यान तालुकाप्रमुख सतीश सपकाळ बोलत होते की होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका ताकदीनिशी लढविण्यासाठी व पक्ष वाढ विस्तार तसेच तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध समिती स्थापन करून निराकरण करण्यात येईल तसेच एक कॉल समस्या स्वाल हा देखील उपक्रम राबवण्यात येईल, अशी माहिती यावेळी सपकाळ यांनी दिली.
या बैठकीसाठी जिल्हा संपर्क नेते महेश साठे ,जिल्हा प्रमुख महेश चिवटे युवासेनचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, उपजिल्हाप्रमुख दिपक खंडागळे, तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माळशिरस तालुका आढावा बैठक पार पडली.
दरम्यान महेश साठे ,महेश चिवटे,प्रियदर्शन साठे,ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भीमराव भुसणर, तालुका कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर,तालुका उपप्रमुख सुनील साठे, सहसमन्वयक अशोक शिंदे, अकलूज शहराध्यक्ष महेश पवार, शिवसैनिक शिवाजी नाईकनवरे , सामाजीक कार्यकर्ते सुधीर साठे ,शिवसैनिक सुधीर पवार , समीर शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकी प्रसंगी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे, सहसमन्वयक रावसाहेब कोकाटे, तालुका उपप्रमुख तानाजी भोळे ,तालुका उपप्रमुख रणजीत गायकवाड ,तालुका सहसंघटक पुण्यवंत मुंडफणे, तालुका सोशल मीडिया प्रमुख अमोल साठे,नातेपुते शहराध्यक्ष पै. निखिल पलंगे, उपशहर प्रमुख भैया लांडगे ,माळशिरस शाखाप्रमुख महादेव जगताप, वेळापूर शहर प्रमुख महेंद्र साठे सह तालुक्यातील सर्व शिवसैनिक युवासेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.