
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी –
लोहा शहरात दि. ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमी निमित्त श्री बालाजी मंदिर सेवा समिती देऊळगल्ली च्या वतीने भगवान श्रीराम प्रभू यांच्या मुर्तीची भव्य शोभायात्रा मुख्य रस्त्याने काढण्यात आली.
यावेळी जय श्रीराम च्या घोषणांनी लोहा शहर दुमदुमले तसेच यावेळी रामजी की निकली सवारी रामजी की लीला हे भारी आदी गितावर भाविक भक्तांनी नृत्य केले.
यावेळी श्रीराम शोभायात्रेत लोहा न.प.चे लोकनियुक्त मा.नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, मा. नगरसेवक संदीप दमकोंडवार,मा.नगरसेवक युवराज वाघमारे,पिंटू सावकार सुर्यवंशी, शिवाजी आंबेकर,,हरी आंबेकर,आशिष व्यवहारे,नागन किलजे, नागेश संगवे, गिरीश ढगे, पांडुरंग रहाटकर,संजय चालिकवार, पिंटू आंबेकर,बाळू खोडवे, व्यंकट खोडवे, मोतीराम चुडावकर, यांच्यासहित मोठ्या संख्येने भाविक भक्त, महिला भगिनींनी उपस्थित होत्या.
सदरील शोभ यात्रेची जागोजागी आरती करण्यात आली.