
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष शिबिर दिनांक २३ ते २९ मार्च २०२५ रोजी डोंगरशेळकी (ता. उदगीर) येथे उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरात ५९ स्वयंसेवकांनी भाग घेतला. शिबिरादरम्यान मोफत पशुरोग निदान व उपचार, गोचीडनाशक फवारणी, रेबीज लसीकरण, मुरघास निर्मिती, नैसर्गिक शेती, जलसंधारण व पोषण विषयक कार्यक्रम राबविण्यात आले.
डॉ. अनिल पाटील, डॉ. अशोक भोसले, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. संभाजी चव्हाण यांनी शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभले.