
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी –
जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची शिक्षक।सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष आंबूलगेकर याच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांना सत्कार केला .तसेच थकीत वेतन बील लवकर मिळावे, अवघड क्षेत्रात निकष डावलून पोस्टिंग झाल्या त्याची चौकशी व्हावी यासह आठ मागण्याचे निवेदन देण्यात आले
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने सोमवार (७ एप्रिल ). रोजी जिल्हा परिषदेच्या .मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली याचा शिक्षक सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला
31 मार्च 2025 पुर्वी थकीत बिले प्रलंबित आहेत ते काढावेत, अवघड क्षेत्र बाबत पुन्हा पडताळणी करावी व शिक्षकांना न्याय द्यावा. , आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना वेतनवाढ द्यावी, , विषय शिक्षकाना वेतनश्रेणी लागू करावी , 2005 पुर्वी जाहिरात असलेल्याना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात , ,बारा वर्षे सेवा पुर्ण करणा-या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे, पवित्र पोर्टल मध्ये टप्पा 2 लवकरच सुरू होत असून त्यामध्ये उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षक, विषय शिक्षक पदे संचमान्यतेनुसार रिक्त दाखवावित . अनेक वर्षा पासून शिक्षक पदोन्नती व वेतनश्रेणी प्रलंबित आहे ते तात्काळ मार्गी लावले असा मागण्याचे निवेदन शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण ,जिल्हाध्यक्ष संतोष आंबूलगेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली लवकरच काही विषयावर चौकशी सुरू होईल असा विश्वास शिष्टमंडळाला मुख्यकार्यकरी अधिकारी यांनी दिला
सून वंचित ठेवले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल चे मुस्तफा शेख, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चिद्रावार, जिल्हा समन्वयक रविराज जाधव, जिल्हा संघटक प्रकाश कांबळे, तालुका अध्यक्ष प्रकाश फुलवरे, नारायण लोखंडे, विठ्ठल बरुरे जिल्हा संघटक, धम्मकिरण कोकणे , ज्ञानेश्वर येंजणे शिवराज सोमवारे गौतम वाघमारे श्री मद्देवाड सुरेश चाबूकस्वार काळेवाड, कमठेवाड ,श्रीमती नगमा सिद्दीकी, श्रीमती सुलताना आफ्रिनमॅडम , सिरीन सुलताना मॅडम , आमीन मॅडम, अंजुम मॅडम, श्री अबरार ,यासह माहूर तालुक्यातील बहुतांश शिक्षक बांधव उपस्थित होते.
आपल्या मागण्या सोडवण्यात येतील असे सीईओ यांनीं आश्वासित केले.