
दैनिक चालु वार्ता चाकूर प्रतिनिधी -किशन वडारे ========================चाकूर तालुक्यातील बापू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागेशवाडी या शाळेतील सायली बरेवाड या विद्यार्थिनीने 116 गुण घेऊन एनएमएमएस परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून तालुक्यातून दुसरी येण्याचा मान पटकाविले .
इयत्ता आठवी मधून 39 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . यांनी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी कुमारी सायली दत्तात्रय बरेवाड , कुमारी स्नेहा संग्राम गव्हाणे आणि कुमारी ज्ञानेश्वरी नामदेव केंद्रे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून यांनी शाळेची यशाची परंपरा कायम राखली आहे . या विद्यार्थ्यांना प्राचार्य महादेव मद्ये , सूर्यकांत मुंडे ,संदीप कासले , श्रीमती तेलंग अनिता , प्रा . ज्ञानेश्वर चामे यांचे मार्गदर्शन लाभले आहे .
याबद्दल संस्थेचे सचिव मा. देविदासरावजी नादरगे साहेब, प्राचार्य महादेव मद्ये ‘सूर्यकांत गव्हाणे , धर्मेंद्र बोडके ,रवी झांबरे , प्रा . बालाजी नलाबले प्रा . सूर्यकांत गायकवाड प्रा . पाटील गजानन , प्रा बाबुराव हेळगे , प्रा अमोल राठोड , कांचन देशमुख ,बबीता देवर्षे , पुंडलिक फफागगिरे , ज्ञानोबा इंद्राळे, सुभाष चामलेवाड आदिनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .