
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
भोर,जि.पुणे : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक सवंगड्यांना सोबत घेऊन तत्कालीन परकीय आक्रमक आणि जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी ३८० वर्षांपूर्वी म्हणजेच इ.स. १६४५ मध्ये चैत्र शुद्ध सप्तमीस भोर तालुक्यातील श्री क्षेत्र रायरेश्वर येथील स्वयंभू महादेवाला बेल भंडारा वाहून शपथ घेतली त्या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून श्री क्षेत्र रायरेश्वर येथे नुकताच हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिन साजरा विध कार्यक्रमांनी करण्यात आला.
चैत्र शुद्ध सप्तमी तिथीनुसार यावर्षी शुक्रवार दिनांक ०४ एप्रिल २०२५ रोजी श्रीक्षेत्र रायरेश्वर येथे पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांनी या सोहळ्याची सुरवात करण्यात आली पहाटे शंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर गड आणि ध्वज पूजन, मशाल मिरवणूक, ह.भ.प. राहुल महाराज पारठे यांचे वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांचा सहभागाणे छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक, हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे बोधचिन्ह अनावरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हिंदवी स्वराज्य स्वराज्य स्तंभ आरेखनांचे विमोचन, डॉ. सचिन पुणेकर लिखित मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) – अर्थात परकीय जैविक आक्रमण विरोधी चळवळी विषयक पुस्तिकेचे अनावरण, श्री. लक्ष्मण शिंदे लिखित रायरेश्वर अभंगाचे सादरीकरण, श्री. दत्तात्रय गायकवाड लिखित वारी पंढरीची पुस्तकाचे विमोचन, सांस्कृतिक कार्य संचालनालय, शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिववंदना, शिवकार्यात योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांचा सन्मान तसेच ग्रामस्थांकडून सरदार घराण्यांचा सन्मान करण्यात आला तसेच संदीप खाटपे यांचे शिव-व्याख्यान व स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन असे विविध उपक्रम साजरे झाले.
हा सोहळा आमदार शंकर मांडेकर , सांस्कृतिक कार्य संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग संचालक, विभीषण चवरे, डॉ. नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी, रायगड भूषण-राजपुरोहित प्रकाश स्वामी, डॉ. सचिन अनिल पुणेकर श्रीमती शीतल राठोड, दत्तात्रय जंगम सुनील चिकणे रणजीत शिवतरे, संतोष घोरपडे, रवींद्र जंगम, सचिन देशमुख, समीर घोडेकर, युवराज जेधे, रवींद्र कंक, प्रदीप मरळ, मंगेश शिळीमकर, बाळासाहेब सणस व इतर सन्माननीय मान्यवरांसोबत छत्रपती शिवरायांसोबत त्याकाळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी, संत, अभ्यासक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, लोककलाकार यांच्या उपस्थितीत पार पडला.