
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी येथील वेद विद्यालय पाठशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान, व माऊलींना पहाटे जलाअभिषेक करून अत्यंत साधेपणाने आपला 70 वा वाढदिवस येथील आळंदी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी वायफळ खर्चाला फाटा देत, वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करून अत्यंत साधेपने आपला वाढदिवस साजरा केला, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केक न कापता, ब्रह्म वृद्धांच्या साक्षीने वेदमंत्र उपचाराद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला. या ठिकाणी नंदकुमार वडगावकर यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आळंदी शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,संपूर्ण वडगावकर कुटुंब व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली 40 वर्षांपासून अनेकांची दोस्ती असणारे, दिल दोस्ती दुनियादारीतील राजकुमार, असे अनेकांनी या ठिकाणी सांगून काकांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.