
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : पूर्व हवेलीतील खराडी, चंदन नगर, वडगाव शेरी, लोहगाव, वाघोली व आव्हाळवाडी या भागासाठी अग्निशामक केंद्र असावे यासाठी पुणे महानगरपालिका यांनी खराडी चंदन नगर भागात सन २०१८-२०१९ साली अग्निशामक केंद्र मंजूर करण्यात आले होते त्याचे काम आता पूर्णत्वास आले आहे पण ते चालू झालेले नसुन. चालु करण्यासाठी मुहूर्त कधी निघेल?? हाच प्रश्न जनसामान्य नागरिकांना पडला आहे.
खराडी भाग आय टी हब म्हणून ओळखला जातो.खुप साऱ्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्याचे काम खराडीतून चालते . संपूर्ण खराडी चंदन नगर भागात एका आर्थिक वर्षात १२५ ते १५० आग लागलेल्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यात खूप सारे आर्थिक नुकसान झालेले आहे. या अग्निशामक केंद्राचे संपूर्ण काम झाले असून सर्व कायदेशीर हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत तरी फक्त उद्घाटना अभावी अग्निशामक केंद्र बंद आहे.
प्रमुख मागण्या:-
– अग्निशामक केंद्र तात्काळ चालू करावे.
– या अग्निशामक केंद्राला खराडी अग्निशामक केंद्र असे नाव देण्यात यावे.
– या अग्निशामक केंद्राला कुठल्याही राजकीय व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नाव देऊ नये.
– कोणत्याही महापुरुषांचे नाव अग्निशामक केंद्राला देण्यात यावे.
आम्ही शिरूरकर मित्रपरिवार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बाळा उर्फ रमेश धोंडीबा पऱ्हाड यांनी आपल्या निवेदनाद्वारे आयुक्त पुणे महानगरपालिका यांच्याकडे मागण्या केलेल्या आहेत