
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी –
भूम तालुक्याचे आराध्यदैवत श्री क्षेत्र अलंमप्रभू देवस्थान असून वर्ष भर देवस्थानात भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच यात्रा काळात तालुक्यातील भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. देवस्थान असणाऱ्या जागेत कांही बांधकामे जुनी झाली आहेत त्यासाठी अलंमप्रभू ट्रस्टने मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला आहे. यात भाविकासाठी असणारा सभा मंडप मोठा करण्यात येणार आहे. तसेच मुख्य देवस्थानच्या बाजूला नवीन फरशी टाकण्यात येणार आहे यामुळे भाविकांना देवस्थान ठिकाणी प्रशस्त सोय होणार आहे. हा सर्व खर्च श्री क्षेत्र अलंमप्रभू ट्रस्ट करणार असून भाविकांनी यासाठी देणगी स्वरूपात मदत करावी असे आवाहन अलंमप्रभू ट्रस्टचे रवींद्र टेकाळे यांनी केले आहे. देवस्थान ठिकाणी श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी श्री क्षेत्र अलंमप्रभू ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप शाळू महाराज, बाळासाहेब हुरकुडे, रवींद्र टेकाळे, हरीभाऊ पवार, दीक्षित काका, युवा नेते आबासाहेब मस्कर, संतोष सुपेकर, डिसले, सास्तुरे व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.