
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी- राजेंद्र पिसे
माळशिरस प्रतिनिधी
नातेपुते – नातेपुते नगरीचे उपनगराध्यक्ष अतुल राजेंद्र पाटील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करुन शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ रोजी आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. या दिवशी ते कसलाही सत्कार पुष्पगुच्छ शाल, श्रीफळ, हार न स्विकारता शालेय साहित्य फुलांच्या मळापेंक्षा विचारांना दिशा देणारी पेन व ज्ञानाचे दारे उघडणारी पुस्तके यांचा स्वीकार करणार आहेत. जमा झालेले शालेय साहित्य व त्यामध्ये आपले अधिक शालेय साहित्य देऊन ते नातेपुते येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मुलांना वाटप करणार आहेत.ही सामाजिक वडलोपार्जित परंपरा कायम सुरु ठेवत व सामाजिक बांधिलकी जपत ते मागील अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करत आहेत.
आपण ही समाजाचे काही तरी देणे लागतो, या उद्देशाने हेतूने अतुल बापू हे समाजसेवा करत आहेत. समाजसेवेचा वारसा त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतलेला आहे. त्याचे वडिल स्व. राजेंद्र हनुमंत पांढरे पाटील भाऊ हे समाजरत्न पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकरी व नातेपुते गावचे पोलीस पाटील होते ते नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक,राजकारण, शेती क्षेत्राच्या कार्यात कार्यरत होऊन समाजसेवा करीत होते, त्यांचाच वारसा घेवून व शंभू महादेवाच्या आशीर्वादाने अतुल बापू पाटील हे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नातेपुते गावांमध्ये उपनगराध्यक्षपदी व विविध पदावर काम करत असताना कामामध्ये पारदर्शकपणा ठेवून काम करत आहेत सातत्याने सामाजिक कामासाठी वेळ देतात, शेतीविषयी, पाणी पुरवठा,स्वच्छता, रस्त्यासाठी, आरोग्य, वृक्षारोपण आदी लोकोपयोगी कामे करत गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, महापुरुषांची जयंती पुण्यतिथी उत्सवात सक्रिय सहभागी होऊन अल्पावधीतच त्यांनी सर्वांची मने जिंकली असून सर्वांना सोबत घेत सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे काम त्यांनी केले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
वाढदिवसानिमित्त वायफट खर्च न करता शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करुन मित्र परिवार, बालगोपाळ यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करणार आहेत.
सध्या सर्वत्र धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस अतिशय धुमधडाक्यात केले जात आहेत. यासाठी मोठा खर्च करण्यात येत आहे. अतिरेकी सजावट, फटाके वाजवणे, डिजे असा खर्च करण्याची सध्या चढाओढ निर्माण झाली आहे. मात्र सामाजिक आत्मभान ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करणे प्रमाण कमी झाले आहे. माझा प्रत्येक वाढदिवस समाजोपयोगी व्हावा यासाठी मी प्रयत्न करतोय, त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, आपण देखील आपला वाढदिवस अश्याच सामाजिक कार्यातून साजरा करावा असेही शेवटी नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल बापू पाटील यांनी सांगितले आहे.