
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी
-आळंदी नगरपरिषदेच्या वतीने हरिपाठ उद्यान, पार्किंग, पंप हाऊस येथे सुरक्षेच्या उद्देशाने ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
आळंदी नगरपरिषद ने नवीनच हरिपाठ उद्यान सुरू केले आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक येत असतात. सुरक्षेचा दृष्टीने उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी १६ तसेच आळंदी नगरपरिषदचे एकमेव पार्किंगचे ठिकाण
वाहनतळ येथे ८ सीसीटीव्ही कॅमेर बसविले तर जल शुद्धीकरण केंद्र येथेही १६ सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून सुरू केले आहेत. दरम्यान, पार्किंगमध्ये या अगोदर काही चोरीचे प्रकार समोर आले होते, तसेच त्या ठिकाणी येणार्या वाहने त्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. आता सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे पार्किंगमध्ये लागणार्या वाहनांची संख्या कळणार आहे. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.