
दैनिक चालू वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
(तालुक्यातील पुढारी व मंत्री महोदय निष्कामी हे झाले आहे असा थेट आरोप करत जिल्हाप्रमुखांनी विविध प्रश्नाला हात घातला..!)
( बालाजी रेड्डी यांनी लातूर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी कार्य करणारा एकमेव नेता अशी प्रतिक्रिया दिसून येते व त्यांचे कार्या ग्रामीण भागातून प्रेरणादायी दिसत आहे… सुभाष गुढिले टेंभुर्णी. यांच्या मते?
====================
लातूर(अहमदपुर):-
तालुक्यातील मुख्य शहरातील नांदेड ते लातूर रोड लगत असलेल्या शासकीय तहसीलदार कार्यालय व येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘शिवनेरी’ शिवसेना कार्यालया पासुन तहसिल कार्यालया पर्यंत मोर्चा काढून घोषणा देत जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे व राशनचे अनुदान देण्यात यावे, घरकुल लाभार्थ्यांना वाळू मोफत वाटप करून अनुदान द्यावे, शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी थांबवावी या गंभीर प्रश्नावर महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध करून येथील तहसीलदार उज्वला पांगरकर यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टीने वचननामा जाहीर केला, त्यामध्ये शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते व लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. शेतकरी गट असलेल्या राशन लाभार्थ्यांना तात्काळ राशनचे अनुदान देण्यात येईल, शेतातील व घरगुती वीज बिल माफ करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी बँकेचे घेतलेले कर्ज माफ करण्याऐवजी बँकेने कर्ज धारक शेतकऱ्यांना वसुलीसाठी दमदाटी सुरू केली आहे आज शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कुठल्याही पिकाला हमी भावा प्रमाणे दर मिळत नाही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे तरी सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही त्या बदल्यात कर्ज वसुली शक्तीने केली जात आहे त्यामुळे शेतकरी मागे आड आणि पुढे विहीर अशा गंभीर परिस्थितीत उभा आहे. शेतकरी कर्जापोटी आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहे त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून तात्काळ कर्ज वसुली थांबविण्यात यावी व कर्जमाफी देण्यात यावी. लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांना राशनचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, शेतीतील व घरगुती वीज बिल माफ करण्यात यावे. घरकुलाच्या लाभार्थ्यांना वाळू मोफत वाटप करण्यात यावी व उर्वरित अनुदान तात्काळ घरकुलधारकांच्या खात्यात जमा करण्यात यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, विधानसभा संघटक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. संतोष रोडगे सर,तालुकाप्रमुख दत्ता हेंगणे, माजी तालुकाप्रमुख विलास पवार हंगरगेकर, तालुका संघटक अनिकेत फुलारी, नगरसेवक संदीप चौधरी, शहर प्रमुख शिवा कासले, शेतकरी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर जायभाये, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, उपतालुका प्रमुख गणेश माने, तिरुपती पाटील,पवन देऊळकर, लहू बारवाड, संतोष आदटराव, उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे,विभाग प्रमुख व्यंकट सरकुटे, गजानन येन्ने, सोमनाथ आढाव,गणेश चव्हाण, विश्वनाथ पवार, विठ्ठल मंगे,कालिदास धुळगुंडे, प्रदीप जायभाये, भगवान कदम, बाळू भोसले, गंगाधर कल्याणे, नागनाथ कल्याणे, अमोल कोरे, राजीव थगनर, सिद्धेश्वर औराळे, संतोष सूर्यवंशी, अमर पाटील, जयराम इप्पर, निळकंठ आलापुरे, भरत कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.