
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
स्व. व्यंकूबाई शंकरराव तोटावार यांच्या स्मरणार्थ उपजिल्हा रुग्णालयास गोरगरीब गरजू रुग्णांना उन्हाळ्याची झळ लागू नये म्हणून रुग्णांसाठी दोन एअर कूलर आणि एक थंड पाण्याचे वॉटर कूलर तोटावार परिवार, मलशेटवार परिवार, वरगणटीवार परिवार यांच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांच्या उपस्थितीत रुग्णालयास भेट करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नरेश देवणीकर यांनी वस्तू स्वरूपात रुग्णालयास रुग्णांच्या हितासाठी दान करण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत प्रसंगी तोटावार, मलशेटवार व वरगंटीवार परिवारांनी रुग्णाचे हित लक्षात घेता रुग्णालयास वस्तू स्वरूपात भेट दिले.या प्रसंगी तोटावार, मलशेटवार व वरगंटीवार परिवारातील सदस्य उपस्थित होते.सोबतच शहरातील डॉक्टर, पत्रकार, प्राध्यापक आणि व्यापारी मंडळी उपस्थीत होते. शहरात या परिवारांनी वेंकुबाई शंकरराव तोटावार यांच्या स्मरणार्थ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी एअर कूलर आणि थंड पाण्याचे वॉटर कूलर दिल्या बदल सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या प्रिय जणांच्या स्मरणार्थ भेट वस्तू दिल्या बदल रुग्णालय प्रशासनाने वरील परिवारांचे आभार मानून देगलूर व परिसरातील सर्व लोकांनी वस्तू स्वरूपात रुग्णालयास दानशूर व्यक्तीनि भेट देण्याचे आव्हान केले आहे.