या महिलांचे ₹१५०० बंद होणार…
लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु आहे.
अद्याप ही पडताळणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उरलेल्या सर्व महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु राहणार आहे. अजून यासाठी काही कालावधी लागणार आहे.
लाडकींच्या अर्जांची तपासणी
लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी ५ टप्प्यांमध्ये केली जात आहे. त्यात महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अद्याप झालेली नाही. लवकरच ही तपासणीदेखील पूर्ण होईल, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
या महिलांचे अर्ज होणार बाद
आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचे अर्ज बाद केले आहेत. ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाही तरीही बोगस कागदपत्रे तयार करुन लाभ घेतला त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत.९ लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. आता हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. ५० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारचा मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेत निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यांना यापुढे कधीही १५०० रुपये मिळणार नाही. काही महिलांना मागच्या दोन महिन्यांपासून पैसे दिले जात नाहीत. या महिलांचे अर्ज आधीच बाद केले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले आहे. यापुढे ज्या महिलांचे अर्जांची अजूनही तपासणी बाकी आहे त्यांची तपासणी लवकरच होईल. त्यातून निकषात न बसणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत.
