दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : आज उरळगाव येथे कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन व उरळगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मूलभूत अधिकार जनजागृती अभियान करुणामय समाजाकडे वाटचाल हा उपक्रम घेण्यात आला. सकाळी 8 वाजता या कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी सरपंच ताई भाग्यश्री होलगूंडे, उपसरपंच,लंका पाचुंदकर, तसेच सदस्य, गावातील इतर मान्यवर महिला मुले युवा युवती जेष्ठ नागरिक असा सर्व समुदाय उपस्थित होता.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या
स्वागताने करण्यात आली. यानंतर दीप प्रज्वलन तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध व संविधान यांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीचा अध्यक्ष निवड करण्यात आली वेताळ सर यांचे सूंदर व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विविध विचारांचा आढावा घेतला.यानतर कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशच्या ज्योती पारधी मॅडम,भाग्यश्री होलगूंडे राजेंद्र सात्रस(ग्राम विकास अधिकारी) व्हा.चेअरमन राजेंद्र गिरमकर ,भिमराव कुदळे (विभाग प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे) (पोलीस पाटील )सागर गिरमकर,नामदेव गिरमकर,(खरेदी विक्री संचालक) दशरथ आफळे गुरजी,भानुदास शिंदे मेजर (वन अधिकारी)वेताळ सर मनोगते झाली. महिला मंडळ सदस्य प्रिती ओव्हाळ यांचे काव्य वाचन झाले.तसेच तबला वाद कैलास ओव्हाळ यांनी तबला वाजवून त्या तालावर महिलांनी गायन केले. त्यानंतर मंदिरामध्ये बालकांचे वाचन अभियान घेण्यात आले,आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे अंधारातून प्रकाशाकडे चला याची समुदायाला आठवण करून देण्यासाठी कॅन्डल मार्च घेण्यात आले.
आंबेडकरांनी सांगितलेल्या मूलभूत अधिकार याची माहिती समुदायाला मिळण्यासाठी महिला मुले युवक यांच्यामध्ये मूलभूत अधिकार जनजागृतीचे अभियान घेण्यात आले.सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएमजी समितीचे कार्यकर्ते भाऊसाहेब कोकडे तसेच युवा मंडळ चे सदस्य विशाल ओव्हाळ यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी कु सचिता विशाल ओव्हाळ यांनी सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमाला युवा कार्यकर्ते मोहन सात्रस व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले, तसेच कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाऊंडेशन च्या ज्योती पारधी तेजश्री घायतडक आणि अश्विनी संकपाळ यांनी देखील सहकार्य केले