
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनीधी –
दिनांक 23/04/2025 रोजी कसगी गावचे त्यांचे सलग पाचव्या वेळी विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरूम च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल
कसगी ता उमरगा गावच्या नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आले..
विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीच्या टप्प्यापासून आजतागायत सतत मार्गदर्शक संचालक म्हणून ते काम करत असतात.
विकासापासून वंचित असलेल्या उमरगा तालुका, साखर कारखान्याची निर्मिती करून शेतकरी बांधवांच्या मदत करणे हेतू, तसेच तालुक्यातील लोकांच्या हाताला काम मिळावे या उदात्तहेतूने या कारखान्याची उभारणी करण्यात आली. अनेक संकटातून मार्ग काढत मागील 25 वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम विठ्ठल साई च्या माध्यमातून झाले आहे. म्हणून
कसगी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री मल्लिनाथ वसंत बोरुटे आयोजित या नागरी सत्काराला गावातील शेतकरी तरुण मित्र उपस्थित होते.
यावेळी संचालक पदी निवड झाल्यामुळे श्री मल्लिनाथ बोरुटे ग्राम पंचायत सदस्य यांच्यावतीने शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शशिकांत चनपटने गुरुजी, उपाध्यक्ष दिगंबर भोसले, माजी अध्यक्ष सुधाकर नंदर्गे,भीमाशंकर बोरूटे, रवी मनगुळे, विजय कलशेट्टी, बनगीशा मकानदार, शिवानंद शाणप्पा सुंटनुरे , शिवानंद रेवणप्पा सुंटनुरे माणिक सुंटनुरे ,नागेंद्र पाटील, श्रीधर गुरव,
माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर लिंबाजी नवले व प्रकाश बदोले, शिवनागय्या स्वामी, दत्तूसिंग ठाकूर ,सुखदेव गुरव, सुभाष गुरव, रमेश चनपटणे, रामेश्वर मुलगे,निळु गायकवाड,गवडा पाटील, नागेंद्र पाटील या सर्व नागरिकांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आले.