
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर चंदगड -संदिप कांबळे
चंदगड/ प्रतिनिधी :- बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर चंदगड तालुक्यातील सुपे फाट्यानजीक ट्रक आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या मध्ये चंदगड एसटी आगाराचे चालक लक्ष्मण हळदणकर ( रा. चंदगड ) हे जागीच ठार झाले. वाहकासह बस मधील अन्य ११ प्रवासी गंभीर जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी अडीजच्या दरम्यान कोदाळी बेळगाव एसटीचा अपघात झाला. यातील ४ गंभीर जखमींना उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर अन्य ६ जखमी प्रवाशांना उपचारांसाठी चंदगड येथे आणण्यात आले आहे. बसचे वाहक सुरेश मनरहोळकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथे हलविण्यात आले आहे.
सुपे फाट्यानजीक ट्रक व चंदगड डेपोच्या बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये बसच्या समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात बस चालक लक्ष्मण हळदणकर जागीच ठार झाले. वाहक यांच्यासह अन्य बसमधील १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बस मधील सीट तुटून बसच्या बाहेर पडल्या आहेत. ट्रकच्या केबिनचे नुकसान झाले आहेत. अपघातानंतर बघ्यानी एकच गर्दी केली होती. प्रत्येकाच्या तोंडातून बस चालका बद्दल हळहळ व्यक्त होतं होती.