
दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनीधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): पाटोदा तालुक्यातील मौजे सावरगांव सोने येथील रहिवाशी श्री.मधुकर मारोती वायबसे (वय 58 वर्ष) यांचा मुलगा श्री. आशोक मधुकर वायबसे हा इंडियन आर्मीमध्ये देशसेवा करत असुन सद्या मथुरा या ठिकाणी कार्यरत आहे. यांच्या मालकीची असलेली मौजे सावरगांव (सोने) येथील गट नं 189 मधील शेतात आंबा या फळपिकाची लागवड करण्यात आलेली असुन श्री. संजय अजिनाथ वायबसे याने दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास त्यांच्या शेतातील समाईक असलेल्या बांधाला जाणीवपुर्वक आग लावल्याने आशोक मधुकर वायबसे यांच्या मालकीच्या शेतातील आंब्यांच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील बांधाला मोठ्या प्रमाणात गवत आहे, आग मोठ्या प्रमाणात लागु शकते व त्या आगीमुळे आंब्याच्या झाडांना इजा होवु शकते. या बाबत सबंधीतास श्री. मधुकर मारोती वायबसे यांनी प्रत्येक्ष सांगुन देखील बांधाला आग लावुन शेतातील आंब्याच्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर जाणीवपुर्वक नुकसान केले आहे. सबंधीत शेजारी हा गेली दोन वर्षापासुन अशा प्रकारची जाणीवपुर्वक नुकसान करत असल्याचे देखील सबंधीत शेतकर्यांनी सांगीतले. तसेच आंबा बागेचे वन्यप्राण्यांपासुन संरक्षण व्हावे या साठी बागेच्या क्षेञाभोवती तारेचे कंपाऊंड करण्यात आलेले असुन सदर कंंपाऊंडच्या तारा सुद्धा जागोजागी तोडुन, वाकवुन जाणीवपुर्वक चोरट्या वाटा तयार केलेल्या आहेत. सबंधीत शेजार्यास गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी समज देवुन ही त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात राञीचा दिवस करुन एक एक थेंब पाण्यासाठी जिव तोडुन लहान मुलांप्रमाणे संगोपण केलेले झाडे उघड्या डोळ्यासमोर आगीने होरपाळली. या बाबत योग्य ती कार्यवाही करण्यात करण्यासाठी पाटोदा पोलिस स्टेशन चे पो. नि. यांच्याशी संपर्क केला असल्याचे सबंधीत नुकसानग्रस्त शेतकरी श्री. मधुकर वायबसे यांनी सांगीतले. सबंधीतास झाडांचे महत्व व कायद्याचा धाक या बाबतची जाणीव व्हावी या साठी काय कार्यवाही होणार? हे पहाणे महत्वाचे आहे.