
दैनिक चालु वार्ता चाकूर प्रतिनिधी -किशन वडारे
लातूर चाकूर
————————————————-
शाहू विद्यालय, शेळगावमध्ये सन २००७-०८ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना विशेष सन्मान देण्यात आला आणि त्यांच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिगत प्रवासाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हाके नागेश भिमदासराव होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना सुखी आणि यशस्वी जीवनाचा मंत्र दिला. तसेच सुर्यवंशी अरुण, संतोष देशमुख, गायकवाड एस.यू, स्काऊट मास्टर सुगावे बालाजी चंद्रकांत, गायकवाड एकनाथ, संतोष पुष्कर या मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्नेह मेळाव्याचे सामाजिक आणि वैयक्तिक महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण मोरकिळे यांनी कुशलतेने पार पाडले. माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, आपले अनुभव आणि विचार व्यक्त केले. त्यात प्रविण मोरकिळे, विश्वनाथ बदनाळे, प्रशांत सोलापूरे, किरण भुरे, आवळे गणेश, उमाकांत पवार, बाबासाहेब हंबीर, रामेश्वर हवा, नंदकुमार माने, विठ्ठल केंद्रे, माने गणेश, सोमनाथ कदम, बेटकर बसवेश्वर, सय्यद दिलदार, जयश्री बेलुरे, आकांक्षा पाटील, शितल बिराजदार, प्रेमा बिरादार, सारीका आवळे, संगीता काळोजी पाटील, अनिता लामदाडे, वैशाली चवळे, मैना शेकदार, ज्योती गवळे, वर्षा उडतेवार यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विश्वनाथ बदनाळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भिमराव कुंभार व सुभाष तोंडारे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयातील विद्यार्थी आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली, यामुळे कार्यक्रमाचे औचित्य अधिक वाढले.
या स्नेह मेळाव्याने जुन्या आठवणी ताज्या करून मैत्रीची नवीन उमेद निर्माण केली. माजी विद्यार्थ्यांनी याचे कौतुक करत भविष्यकालीन अशाच संमेलनाची अपेक्षा व्यक्त केली.