
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:बीड येथील के.एस.के. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षी कांबळे हिच्या
आत्महत्येप्रकरणी गंगाखेडमधील ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
साक्षीवर गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने मानसिक दबाव टाकून ब्लॅकमेल केल्याने तिने आत्महत्या केली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
साक्षीचे लग्न 20 एप्रिल रोजी होणार होते. परंतु तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. यानंतर तिच्या मामाच्या घरी तिने गळफास लावून आयुष्य संपवले. या प्रकरणात आरोपीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात
आरोपीवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, साक्षीच्या बहिणीच्या भूमिकेची चौकशी करून तिला सहआरोपी करावे, के. एस. के. कॉलेजमध्ये पूर्वीही आत्महत्या झाल्याने सीआयडीमार्फत चौकशी करावी. बीडसाठी पोलीस आयुक्त व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र एसपी नेमावा,डीवायएसपी राठोड यांच्यावर दाखल तक्रारींची अॅट्रॉसिटी कायद्यानुसार चौकशी करावी,आरोपीचा जामीन रद्द करून फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी.साक्षीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग व एससी/एसटी आयोगाने दखल घ्यावी.शैक्षणिक संस्थांमधील मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात,या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनावर माजी नगरसेवक गौतम रोहीणीकर, ऑल इंडिया पँथर सेना तालुका अध्यक्ष विकास रोडे, नितीन कांबळे, अशोक व्हावळे, शिवराज पैठणे, शाम पंडीत, रोहिदास लांडगे, महाविरराजे घोबाळे, शिवराज पैठणे, अमोल कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.