
नरेंद्र मोदींसमोर ‘तो’ प्लॅन सादर करणार ; भारत बदला घेणार !
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगाममधील बैसरन व्हॅलीची पाहणी करण्यात आली. पहलगाम येथे नेमकी घटना कशी घडली, याबाबत अमित शाह यांनी माहिती घेतली.
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपालही यावेळी अमित शाहांसोबत उपस्थित होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दुपारी अमित शाह दिल्लीकडे रवाना होणार आहेत. यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेटही घेणार आहेत. दिल्लीत एक महत्वाची बैठक घेण्यात असून यावेळी भारताचं पुढचं पाऊल काय असेल?, कोणती कारवाई करण्यात येणार यावर बैठकीत चर्चा होईल.
संरक्षण मंत्रालयाची बैठक 3 तास चालली-
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुढील कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान, एनएसए अजित डोवाल यांच्यासह बैठकीला तिन्ही सैन्यदलप्रमुख उपस्थित होते. संरक्षण मंत्रालयात ही बैठक तीन तास चालली. बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला कोणत्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो त्या पर्यायांवर सखोल चर्चा झाली. तसेच या बैठकीत ठरवलेले पर्याय आज (23 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. पुढील काही तासांमध्ये दिल्लीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 26 तारखेपर्यतचे नियोजित कार्यक्रम रद्द-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 26 तारखेपर्यतचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. 26 एप्रिलपर्यंतचे कार्यक्रम पंतप्रधान कार्यालयाकडून रद्द झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतरची रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र घेण्यात येणार आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखामींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल