
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
आळंदी. आज दि 23 रोजी महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींची संघर्षगाथा—प्रचिती (लेखक मा.श्री. गौतम कोतवाल सर) या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या पुस्तकात ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज , आळंदी देवाची या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विजय गुळवे सर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कारकीर्दीचा आढावा लेख प्रकाशित झाला .
या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पराग काळकर , कोहिनूर ग्रुप चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, जयराम ग्रुपचे चेअरमन डॉक्टर राजेश भाई शहा, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे व्हॉईस चेअरमन ॲड. शार्दुल जाधव , लेखक गौतम कोतवाल असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय गुळवे सर व सचिव वैष्णवी गुळवे मॅडम यांनी पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे श्रेय सरांनी ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक,मित्र परिवार व कुटूंब यांना दिले व सर्वांचे तसेच आयोजकांचे आभार मानले.