
दैनिक चालु वार्ता जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
पुरंदर जेजुरी = काश्मीर खोऱ्यात देशातील निष्पाप पर्यटकानवर जीवघेणा केलेला भ्याड हल्ला करणाऱ्या आतंक पुरस्कृत पाकिस्तानाला कायमचे खत्म करण्याची सद्बुद्धी जेजुरीच्या खंडोबा देवाने मोदी सरकारला देवो आशी संतप्त प्रतिक्रिया निवृत्त विंग कमांडर विजय कर्णिक यांनी देत जेजुरीगडावर दिली. खंडोबा देवता ही वीर पराक्रमी ऐतिहासिक युद्धविरांचे दैवीक प्रेरणास्थान आहे प्रत्येक वेळेस भ्याड पाकिस्तान हल्ला करणार आणि आपण पाहत बसने योग्य नाही असेही विजय कर्णिक यांनी म्हंटले आहे .
1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात आपला जीव धोक्यात घालून भुज च्या युद्धात पराक्रम दाखविणाऱ्या विजय कर्णिक आणि त्यांचे बंधू निवृत्त विंग कमांडर लक्ष्मण कर्णिक हे बुधवारी जेजुरी खंडोबा गडावर दर्शना करिता आले होते. याप्रसंगी श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंगेश घोणे आणि डॉ राजेंद्र खेडेकर तसेच भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र कोशे यांनी खंडोबा प्रतिमा देऊन सन्मानही केला.
या वेळी परिवारा सह आलेलेल्या कर्णिक बंधूनी मंदिरात अभिषेक करीत देवाला प्रार्थनाही केली यावेळी पौरहित्य सदानंद बारभाई गुरव यांनी केले तसेच जेजुरी गडावरील ऐतिहासिक शस्त्र 42 किलो वजनदार खंडा तलवारीची आठवण करून देत तलवारीचे स्वहस्ते दर्शन घेतले रियल हिरो असलेलेल्या विजय कर्णिक यांच्या 1971च्या भारत पाक लढ्यातील भुज पराक्रमावर भुज द प्राईड ऑफ इंडिंया या वर हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली यात कर्णिक यांची भूमिका अजय देवगण यांनी साकारली होती 71च्या लढाईत 14दिवसात एअर फिल्डवर 35 वेळा हल्ला करण्यात आला होता त्यात 92 बॉम्ब आणि 22 रॉकेटचा समावेश होता त्यावेळी भुज एअरबेसचे प्रभारी कमांडर विजय कर्णिक यांनी जीव धोक्यात घालून स्थानिक तीनशे महिलांच्या मदतीने अवघ्या तीन दिवसातच उध्वस्त हवाई पट्टी पूर्ण तयार केली होती.