
काकूसह पुतण्याच्या दुर्दैवी मृत्यू, तर चार वर्षीय सार्थक थोडक्यात बचावला…
नागपूर शहरातून भीषण अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात लग्नसमारंभ आटोपून घरी परतत असणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. लग्न आटोपून घराच्या दिशेने निघालेल्या दुचाकीवरील तिघांना ट्रकने चिरडले आहे.
या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तर एक चार वर्षाचा बालक गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही दुर्दैवी घटना नागपुरच्या कुही तालुक्यातील गोंडबोरी फाटा (गोंडी फाटा ) येथे घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दैव बलवत्तर म्हणून चार वर्षाचा सार्थक थोडक्यात बचावला
पुढे आलेल्या माहितीनुसार, किशोर मेश्राम हा आपली काकू गुणाबाई मेश्राम आणि सार्थकसोबत दुचाकीवर होता. अशातच समोरच्या वाहनाने जागीच ब्रेक मारल्याने किशोरच्या दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि तो दुचाकीला सवरण्याच्या प्रयत्नात बाजूला येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. या भीषण घटनेत गुणाबाई व किशोरच्या जागीच मृत्यू झाला आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून चार वर्षाचा सार्थक थोडक्यात बचावला असून त्याच्यावर नागपूरच्या (Nagpur Accident News) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. मात्र या घटनेने मेश्राम कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
वाशिमच्या सुपुत्राचा अपघाती मृत्यू , शेंदुरजना मोरे गावावर शोककळा
अशीच एक दुर्दैवी घटना वाशिमच्या शेंदुरजना मोरे गावात घडली आहे. यात भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असलेल्या जवानवर काळाने घाला घातला आहे. बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान वासुदेव संभाजी शेळके (वय 38) यांचे 25 एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यात एका दुर्दैवी कार अपघातात निधन झाले आहे.त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वासुदेव हे गुवाहाटी येथे बीएसएफमध्ये (BSF) कार्यरत असून नुकतेच ते जेवर घरी आले होते. शिवाय, काही महिन्यांनंतर ते सेवानिवृत्त ही होणार होते. अशातच त्यांना मृत्यूनं गाठलं. वर्धाच्या पुलगाव येथील जवानांनी सेवेत कार्यरत आलेल्या आणि अपघाती निधन झालेल्या वसुदेवला सशस्त्र मानवंदना देत अंत्यसंस्कार पर पाडले. यावेळी मोठा जणसमुदाय उलटला होता.