
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम/रिसोड -भागवत घुगे
मांडवा येथील शेतकऱ्यांना मिळणार विविध योजनांची सबसिडी
मांडवा नानाजी श्री देशमुख देशमुख कृषी कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 मध्ये मौजे मांडवा निवड झाली आहे. रिसोड येथील कांबळे मॅडम कृषीसाह्यक मा़ंडवा येथील सरपंच सौ दुर्गा गरकळ यांच्या मार्गदर्शनात या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सुक्ष्म नियोजन प्रक्रिया सुरू आहे. याकरिता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी रात्री मशाल फेरी, सकाळी शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून गाव बैठक घेण्यात आली. यावेळी रिसोड मंडळ कृषी अधिकारी होते यांनी शेतकऱ्यांनी, महिला बचत गटानी, पुरूष गटानी सुक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन हवामान बदल अनुकुलित शेती पद्धतचा समावेश करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी पुढे यावे. तसेच योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभघेऊन शेतकऱ्यांनी आपला विकास करावा, असे आवाहन केले.
सरपंच दुर्गा गरकळ यांनी शून्य मशागत शेतीवर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक कांबळे मॅडम यांनी प्रकल्पाची व्याप्ती यावर माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायतचे डॉ सुरेश गरकळ राजू गरकळ सदस्य समाधान चव्हाण ज्ञानेश्वर गरकळ विजय राठोड मधुकर राठोड डॉ बद्री चव्हाण , विष्णूपंत कांयदे गुरूकुपा शेतकरी गट अध्यक्ष बद्रीनारायण घुगे, प्रकाश गरकळ मंगल गरकळ शोभाताई कांयदे विष्णु घुगे पंढरी गरकळ डॉ तुकाराम राठोड मारोती चव्हाण पंढरी चव्हाण विजय चव्हाण सुधाकर मरकळ सविता गरकळ आदींची उपस्थिती होती.