
दैनिक चालु वार्ता शिराढोण प्रतिनिधी -गजानन देवणे
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड तसेच जिल्हा शिक्षण विभाग जि.प. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा -2023-24 चा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. त्यात सौ. मंजुळाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खतगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील कार्यरत शिराढोणगरीचे भूमिपुत्र प्राध्यापक देवणे विश्वंभर गणपतराव यांचा 11 वी. – 12 वी. सामाजिक शास्त्र या गटात जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सरांनी करोना कालावधीत 227 व्हीडीओ तयार करून you tube च्या माध्यमातून ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन केले आहे.
बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती मेघना कावली, I.A.S मुख्य कार्यकरि अधिकरि, जि.प. नांदेड, प्रमुख उपस्थिती मा.श्री. सुदर्शन चिटकुलवार प्राचार्य, जि.शि.व.प्र.सं.नांदेड, प्रमुख पाहूणे मा. श्रीमती. डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (प्रा), जि.प.नांदेड, मा.श्री. माधव सलगर शिक्षणाधिकारी (मा), जि.प. नांदेड, मा. श्री. दिलीपकुमार बनसोडे शिक्षणाधिकारी (योजना), जि.प. नांदेड तसेच सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता जि.शि.व.प्र.सं. नांदेड यांच्या उपस्थित दि.२९.०४.२०२५ वार-मंगळवार स्थळ- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे संपन्न झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पूढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.