
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवेचा आदर्श ठेवत संभाजी ब्रिगेड व लॅब असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम अत्यंत उत्साही वातावरणात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व सर्जन डॉ. जगदीश येरोळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयवंतराव पाटील, डॉ. लखोटिया, डॉ. पांडुरंग दोडके, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. प्रशांत चोले, डॉ. दत्ता पाटील हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रमोद शेठकार होते.
या शिबिरात विविध वैद्यकीय तज्ञांनी आपली सेवा दिली. डॉ. बिराजदार, डॉ. दर्शन बॅग (एम.डी. मधुमेह व हृदयरोग तज्ञ), डॉ. चित्रा गंध कोतले (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. अभिजीत वानखेडे (एम.एस. सर्जन), डॉ. शुभांगी शिंदे वानखेडे (बालरोग तज्ञ), डॉ. अभय देशपांडे (एम.एस.), डॉ. काळे (आयुर्वेद तज्ञ), डॉ. संदीप सोनटक्के (त्वचारोग तज्ञ), डॉ. विजय बिरादार यांनी रुग्ण तपासणी केली. औषध पुरवठ्यासाठी दाते, सत्यवान बोरकर, श्रीराम नवटके, धनाजी मुळे यांची साथ लाभली.
शिबिरात सिटी स्कॅन, शुगर, थायरॉईड, नेत्र तपासणी, अस्थी तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, दंतरोग तपासणी अशा विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्त संकलनाचे कार्य राधाई ब्लड बँक मार्फत करण्यात आले.
या यशस्वी उपक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने, विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमराव फड, जिल्हा संघटक मेहबूब सय्यद, तालुका अध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव, माजी विधानसभा अध्यक्ष देवाघंटे, तालुका उपाध्यक्ष धम्म सागर सोमवंशी, सचिव सावन तोरणेकर, सहसचिव दीपक गायकवाड, तालुका संघटक सुरज आटोळकर, बंटी घोरपडे, भगवान चौधरी, तुकाराम कांबळे, शशिकांत गायकवाड (निडेबन), आनंदराव भोपणीकर, नागेश कांबळे यांचे मोलाचे योगदान लाभले.
लॅब असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब चिंचोलकर यांचे या उपक्रमासाठी विशेष योगदान लाभले. ओम बोळेगावे, रामेश्वर फुलारी, तुषार मुंडे, रूपेश रत्नावार, लातूर व उदगीर येथील सेवक, सेविका व पत्रकार बांधवांनी आपली सेवा बजावली.
“जे का रंजले-गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा” या तत्वाचा पुरस्कार करत, हा सेवाभावी उपक्रम समाजापुढे आदर्श ठरला आहे. संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून, भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही आयोजकांनी दिली.
जय जिजाऊ, जय शिवराय!
—